मुंबई : मुकेश आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी तूफान चर्चेत आहे. नुकताच गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन पार पडलंय. या प्री वेडिंग फंक्शनला विदेशातूनही पाहुणे पोहचले. आता या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार या प्री वेडिंग फंक्शनमध्ये धमाल करताना दिसले. हे प्री वेडिंग फंक्शन तब्बल तीन दिवस सुरू होते. पाहुण्यांसाठी खास राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. संपूर्ण बच्चन कुटुंब देखील या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले.
पार्टी होती अंबानींची पण सर्वाधिक चर्चा यावेळी रंगली ती म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या बच्चन हिची. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये आराध्या बच्चन ही खास लूकमध्ये दिसली आहे. पहिल्यांदाच आराध्याचे कपाळ दिसल्याचे अनेकांनी म्हटले.
दरवेळी एकाच हेअरस्टाईलमध्ये आराध्या बच्चन ही दिसते. यामुळे ऐश्वर्या राय हिला नेहमीच खडेबोल सुनावले जातात. मात्र, अंबानींच्या पार्टीमध्ये जबरदस्त लूकमध्ये आराध्या बच्चन ही दिसली. अचानक तिच्यामध्ये इतका जास्त बदल पाहून अनेकांनी थेट म्हटले की, आराध्या बच्चन हिची सर्जरी करण्यात आलीये. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
एकाने म्हटले की, आराध्या बच्चन हिची प्लास्टिक सर्जरी केलीये. खरोखरच आराध्या बच्चन हिची प्लास्टिक सर्जरी केली का? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. कारण काही महिन्यांपूर्वी आणि आताच्या आराध्यामध्ये बरेच मोठे बदल असल्याचा दावा केला जातोय. आता आराध्याचे अंबानींच्या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होत आहेत.
आराध्या ही 12 वर्ष 3 महिन्यांचीच आहे. यामुळे तिची प्लास्टिक सर्जरी ही केली गेली नसावी असे, अनेकांनी म्हटले आहे. हेअरस्टाईल आणि मेकअपमुळे आराध्याचे लूक बदलल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आई वडिलांसोबत विदेशात जाताना आराध्या बच्चन ही दिसली. नेहमीच पापाराझी यांना पाहून पोझ देताना देखील आराध्या बच्चन ही कायमच दिसते.