ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या रायने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये नक्कीच गाजवला आहे. ऐश्वर्या रायने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देखील केल्या आहेत. ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. फक्त अभिनयच नाही तर ऐश्वर्या रायने जाहिरातींमधूनही तगडी कमाई करते. ऐश्वर्या राय हिच्या फॅशनकडे सर्वांच्याच नजरा असतात. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन लवकरच घटस्फोट घेणार असल्याचीही मध्यंतरी चर्चा रंगताना दिसली. मात्र, यावर अजूनही बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. मात्र, यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय.
ऐश्वर्या राय नेहमीच चर्चेत असते. ऐश्वर्या राय ही दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते. फक्त सहभागीच नाही तर ऐश्वर्या राय हिच्या लूकचीही जोरदार चर्चा रंगताना दिसते. ऐश्वर्या राय ही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चक्क जांभळ्या रंगाची लिपस्टिक ओठांना लावू पोहचली होती. ज्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले होते.
ऐश्वर्या राय हिच्या जांभळ्या लिपस्टिकनंतर अनेकांनी तिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली होती. दरवेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये काहीतरी वेगळी फॅशन करून जाताना ऐश्वर्या राय ही दिसते. 2019 मध्येही ऐश्वर्या राय ही गोल्डन मेटॅलिक लूकमध्ये पोहचली होती. यावेळी लोकांना ऐश्वर्या राय हिचा लूक जबरदस्त आवडला होता.
ऐश्वर्या राय ही काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचली होती. यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्या राय ही स्पाॅट झाली होती. ऐश्वर्या राय हिच्यासोबत यावेळी आराध्या देखील दिसली. अत्यंत खास लूकमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन या स्पाॅट झाल्या होत्या. ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले.