मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅसमधूनच मिळालीये. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.
उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नसतो. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोधात महिलांनी थेट मोर्चा देखील काढला. आतापर्यंत उर्फी जावेद हिच्या विरोधात पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व गोष्टींचा उर्फी जावेद हिच्यावर अजिबातच काहीच परिणाम हा होत नाही.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच गुलाबी रंगाच्या शर्टपासून एक अतरंगी असा ड्रेस तयार केला. विशेष म्हणजे त्याच ड्रेसवर उर्फी जावेद ही मुंबईच्या रस्त्यांनी फिरताना दिसली. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद हिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसला.
आता नुकताच उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिने तयार केलेल्या एका पदार्थामुळे चर्चेत आलाय. उर्फी जावेद हिने तयार केलेली डिश पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
मुळात म्हणजे यावरून हे कळाले की, उर्फी जावेद हिचे फक्त कपडेच अतरंगी नसतात तर तिची खाण्याची पद्धत देखील अत्यंत खतरनाक आहे. उर्फी जावेद व्हिडीओमध्ये सांगत आहे की, सॉल्टेड चिप्ससह व्हॅनिला आइस्क्रीम तिला सर्वात जास्त खाण्यासाठी आवडते. यावेळी उर्फी जावेद तिची रेसिपी शेअर करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही व्हॅनिला आइस्क्रीममध्ये सोया सॉस घालताना दिसत आहे आणि पुढे म्हणते की, नंतर सॉल्टेड चिप्स सोबत हे खा. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी उर्फी जावेद हिने भगव्या रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हाच व्हिडीओ आता तूफान व्हायरल होत आहे.