ऐश्वर्या राय हिने काढला भाचीवर राग? ‘ते’ फोटो आणि व्हिडीओ व्हायरल..

| Updated on: May 02, 2024 | 11:59 AM

Aishwarya Rai : बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहेत. विविध चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र, असे असतानाही यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाहीये.

ऐश्वर्या राय हिने काढला भाचीवर राग? ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल..
Aishwarya Rai
Follow us on

बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या रायने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय हिने अभिनय आणि जाहिरातींमधून बक्कळ पैसा कमावला आहे. ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिच्या घटस्फोटाची तूफान चर्चा ही रंगताना दिसत आहे. हेच नाही तर सासू आणि ननंदेसोबतही तिचे रिलेशन चांगले नसल्याचे सांगितले जाते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. त्यामधील एका व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत होते की, ऐश्वर्या राय ही काहीतरी बोलण्यासाठी अभिषेक बच्चन याच्याकडे जात आहे. परंतू, ऐश्वर्या राय हिच्याकडे बघून दुर्लक्ष करून तिथून निघून जाताना अभिषेक बच्चन हा दिसला. यावेळी ऐश्वर्या राय हिच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जाताना दिसले.

मध्यंतरी ज्यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. त्यावेळी श्वेता बच्चन हिचे नाव चर्चेत आले होते. श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे अजिबातच जमत नसल्याचे सांगितले गेले. आता सध्या सोशल मीडियावर जुने काही व्हिडीओ आणि फोटो हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय हिच्यासोबत आराध्या आणि नव्या दिसत आहेत.

व्हायरस होणारे फोटो आणि व्हिडीओ एका मॅचमधील आहेत. यावेळी पहिल्यांदा ऐश्वर्याची एंट्री होते आणि त्यामागे आराध्या येते. आपल्या मुलीला घेऊन पुढे जाताना ऐश्वर्या राय ही दिसत आहे. नव्याला तिथेच थांबावे लागते. नव्याला बॅरिकेड्स उघडण्याची वाट पाहत थांबावे लागते. नव्याला सोबत न घेता ऐश्वर्या निघून जाते. यावेळी नव्याकडे दुर्लक्ष करताना ऐश्वर्या राय स्पष्ट दिसते.

हे व्हायरल होणारे फोटो व्हिडीओ जुनेच आहेत. मात्र, सध्या चर्चेत आहेत. यावर कमेंट करत एकाने म्हटले की, बिचारी नव्या. अनेकांचे म्हणणे आले की, नव्याच्या आईचे आणि ऐश्वर्या रायचे समजत नसल्याने ऐश्वर्या राय तिच्यासोबत अशी वागली. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा ही रंगत आहे. मात्र, यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबाकडून काहीच भाष्य करण्यात नाही आले.