बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही जान्हवी कपूर दिसते. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया कायमच एकसोबत स्पॉट होताना देखील दिसतात. जान्हवी कपूर आणि शिखर काही दिवसांपूर्वीच तिरूपती बालाजी मंदिरात गेले होते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे अनेक फंक्शन सुरू आहेत. नुकताच अनंत अंबानी आणि राधिकाची हळद झालीये. या हळदीच्या फंक्शनला अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. या फंक्शनमधील अनेक फोटो आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी जान्हवी कपूर ही देखील शिखर पहाडिया याच्यासोबत पोहोचल्याचे दिसत आहे.
एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अंबानींच्या फंक्शनमध्ये वडील बोनी कपूर यांना पाहून त्यांच्याकडे जान्हवी कपूर ही येते आणि गळाभेट घेते. त्यानंतर जान्हवी कपूर हिच्या पाठोपाठ शिखर पहाडिया हा देखील तिथे पोहोचतो. आणि बोनी कपूर यांना भेटतो. यावेळी बोनी कपूर हे शिखर पहाडिया याला काहीतरी बोलताना दिसत आहेत. दोघांमधील मैत्री या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या नात्याला कपूर कुटुंबियांकडून होकार असल्याचे या व्हिडीओमधून आता दिसत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया लग्न कधी करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया एकमेकांना काही वर्षांपासून डेट करत आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य करणे टाळले आहे.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. बोनी कपूर यांच्यासोबतही शिखर पहाडिया या विमानतळावर स्पॉट झाला होता. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया या अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. शिखर पहाडिया याच्या भावाचे आणि सारा अली खानचे फोटोही व्हायरल होताना दिसले.