हत्तींवर ॲसिड हल्ला, मुद्दाम काढण्यात आलेले डोळे…, ‘वनतारा’ दौऱ्यानंतर मोदींची मन हेलावणारी पोस्ट

| Updated on: Mar 06, 2025 | 12:59 PM

'वनतारा' दौऱ्यानंतर मोदींची हेलावणारी पोस्ट, हत्तींवरील अन्याय, ॲसिड हल्ला, मुद्दाम काढण्यात आलेले डोळे, काही हत्ती तर अपघातात..., पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

हत्तींवर ॲसिड हल्ला, मुद्दाम काढण्यात आलेले डोळे..., वनतारा दौऱ्यानंतर मोदींची मन हेलावणारी पोस्ट
Follow us on

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरात जामनगर स्थित अनंत अंबानी यांचा रेस्क्यू सेंटर ‘वनतारा’ येथे दौरा केला. अनंत अंबानी यांचा ‘वनतारा’ रेस्क्यू सेंटर 3500 एकर जागेत पसरलेला आहे. याठिकाणी जखमी आणि अन्य प्राण्याच्या सुरक्षेची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. याठिकाणी अनेक हत्ती आहेत. काही हत्ती असे आहेत, ज्यांच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे. काहींचे मुद्दाम डोळे काढण्यात आलेत. तर काही अपघातात जखमी झाले आहेत. दौऱ्यानंतर मोदी यांनी मन हेलावणारी पोस्ट शेअर करत प्राण्यांची काळजी घेण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील मोदींच्या पोस्टवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

‘वनतारा’ येथील काही हत्तींचे फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘येथे एक हत्ती आहे, ज्याच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे. सध्या हत्तीवर उत्तम उपचार सुरु आहे. तेथे असे अनेक हत्ती आहेत, ज्यांचे मुद्दाम अंधळं करण्यात आलं आहे. दुसऱ्या एका हत्तीला भरधाव ट्रकने धडक दिली आहे.’

हे सुद्धा वाचा

 

 

मोदी पुढे म्हणाले, इतके निष्काळजी आणि क्रूर कसे असू शकतात? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. तर अशा बेजबाबदारपणाचा अंत करूया आणि प्राण्यांवर देखील मायेने प्रेम करुया…’ दौऱ्यानंतर मोदी यांनी एक्सवर फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

मोदी यांच्या ट्विटवर अभिनेता शाहरुख खान याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. किंग खान म्हणाला, ‘प्राणीदेखील प्रेमाचा हक्क आहे. त्यांना काळजी आणि सुरक्षा हवी आहे. त्याच्या आरोग्यासाठी आणि आपल्या विश्वासाठी… पीएम मोदी यांची वनतारा येथील उपस्थिती याचे महत्त्व अधिक दृढ करते. एखाद्या व्यक्तीच्या मनातील शुद्धता त्यांच्या प्राण्यांवरील प्रेमाच्या दिसून येत आहे…’

यावेळी किंग खानने अनंत अंबानी यांचं देखील कौतुक केलं आहे. ‘दुर्दैवी प्राण्यांना अभयारण्य उपलब्ध करून देण्याची वनतरा आणि अनंत यांची वचनबद्धता त्याचाच पुरावा आहे. हे असंच चालू ठेवा बेटा!! सध्या अभिनेत्याची पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.

 

 

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली याने देखील वनतारा आणि अनंत अंबानी यांचं कौतुक केलं आहे. ‘अनंत अंबानी आणि त्यांची वनतारा येथील संपूर्ण टीम वन्यजीव कल्याणात उल्लेखनीय बदल घडवत आहे.’ सध्या विराटची पोस्ट व्हायरल होत आहे.