मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अहमदाबादच्या युएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देशभरातील मोठमोठ्या राजकीय व्यक्तींपासून कलाविश्वातील कलाकारांपर्यंत.. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे हीराबेन यांना श्रद्धांजली वाहिली. कंगना रनौत, अक्षय कुमार, विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर यांनी पोस्ट लिहित शोक व्यक्त केला.
अभिनेत्री कंगना रनौतने नरेंद्र मोदी यांचा आईसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘ईश्वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कठीण काळात धैर्य आणि शांती देवो, ओम शांती.’ अनुपम खेर यांनीसुद्धा फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या.
‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमच्या मातोश्री हीराबा यांच्या निधनाचं वृत्त ऐकून मन दु:खी आणि व्याकूळ झालं आहे. त्यांच्याप्रती असलेलं तुमचं प्रेम आणि आदर जगजाहीर आहे. त्यांच्या जाण्याने तुमच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कोणीच भरू शकत नाही. मात्र तुम्ही भारत मातेचे सुपुत्र आहात. देशातील प्रत्येक आईचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच असेल. माझ्या आईचाही’, अशी पोस्ट खेर यांनी लिहिली.
माँ को खोने से बड़ा दुख कोई नहीं. भगवान आपको इस दुख को सहने की शक्ति दे @narendramodi जी. ॐ शांति ?
— Akshay Kumar (@akshaykumar) December 30, 2022
My deepest condolences to Shri @narendramodi on the sad demise of his beloved ‘maa’.
भारत माँ के सपूत की माँ का कर्मयोगी जीवन हम सबको प्रेरणा देता रहेगा। शतक शतक नमन।
ओम् शांति। pic.twitter.com/bNPWpI9d2P— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) December 30, 2022
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेता अक्षय कुमार यांनीसुद्धा ट्विट करत सहवेदना व्यक्त केल्या. हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.