PM Modi Congratulates RRR Team: ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू-नाटू’ गाण्याने चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं. आता तर ‘नाटू-नाटू’ गाण्याने विश्व विक्रम रचला आहे. लॉस एंजिलिसमध्ये 80 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाचा डंका पहायला मिळाला. RRR मधील नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे. अभिमानास्पद गोष्ट म्हणजे भारतातील पहिल्या सिनेमाने हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारावर नाव नोंदवलं आहे.
A very special accomplishment! Compliments to @mmkeeravaani, Prem Rakshith, Kaala Bhairava, Chandrabose, @Rahulsipligunj. I also congratulate @ssrajamouli, @tarak9999, @AlwaysRamCharan and the entire team of @RRRMovie. This prestigious honour has made every Indian very proud. https://t.co/zYRLCCeGdE
— Narendra Modi (narendramodi) January 11, 2023
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक एस. एस. राजामौली, ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी हजेरी लावली. सध्या सर्वत्र ‘नाटू-नाटू’ आणि ‘आरआरआर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण सिनेमाच्या टीमचं कौतुक करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिनेमाच्या टीमची कौतुकाने पाठ थोपटली आहे. ट्विट करत मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत मोदी म्हणाले, ‘सर्वात खास सिद्धता…. या प्रतिष्ठित सन्मानाने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे.’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. शिवाय कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना टॅग देखील केलं आहे.
Sir just woke up and started dancing to Naatu Naatu celebrating your win at Golden Globes. Here’s to many more awards & making India so proud!! https://t.co/Xjv9V900Xo
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 11, 2023
अनेक सेलिब्रिटींनी देखील आरआरआर सिनेमाचं कौतुक केलं आहे. अभिनेता शाहरुख खानने देखील सिनेमाचं कौतुक केलं आहे. किंग खान ट्विट करत म्हणाला, ‘सर आताच उठलो आणि गोल्डन ग्लोबमधील विजयावर उत्साह साजरा करत ‘नाटू-नाटू’ गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली..’ सध्या अभिनेत्याचं ट्विट देखील तुफान व्हायरल होत आहे.
आज जगप्रसिद्द झालेलं गाणं कालभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायलं. गाणं शूट करायला बराच वेळ लागला. युक्रेनच्या प्रेसिडेंशियल पॅलेसच्या बॅकग्राउंडमध्ये ‘नाटू-नाटू’ गाण्याचं शुटिंग करण्यात आलं. RRR मधील नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे.