बिग बॉस ओटीटी कन्नड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सोनू श्रीनिवास गौडा (Sonu Srinivas Gowda) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिला एका मुलीला दत्तक घेणं महागात पडलं आहे. सोनू श्रीनिवास गौडा हिला पोलिसांनी अटक केली आहे. दत्तक प्रक्रिया योग्य प्रकारे पार न पाडल्याचे आरोप सोनू श्रीनिवास गौडा हिच्यावर करण्यात आले आहेत. बालकल्याण समितीच्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र सोनू श्रीनिवास गौडा हिची चर्चा रंगली आहे.
नुकताच, सोनू श्रीनिवास गौडा हिने मुलीला दत्तक घेतल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. ज्यामुळे सोनू श्रीनिवास गौडा हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर तिच्या अटकेची माहिती समोर आली. सोनू श्रीनिवास गौडा हिच्यावर बालकल्याण समितीने ( Child Welfare Committee) गंभीर आरोप केले आहेत. रिपोर्टनुसार, सोनू श्रीनिवास गौडा लोकप्रियता आणि प्रसिद्धीसाठी मुलगी दत्तक घेतल्याचे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत.
मुलीला दत्तक घेतल्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक आणि तिची तुलना सेलिब्रिटींसोबत होईल यासाठी सोनू श्रीनिवास गौडा हिने मुलीला दत्तक घेतलं अशी चर्चा रंगली आहे. संबंधीत घटना बयादरहल्ली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर सोनू श्रीनिवास गौडा हिला अटक करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनू श्रीनिवास गौडा यांची चर्चा रंगली आहे.
सोनू श्रीनिवास गौडा हिने स्वतःला निर्दोश म्हटलं आहे. दत्तक प्रक्रिया पूर्ण आणि योग्य प्रकारे पार पाडल्याचा दावा सोनू श्रीनिवास गौडा हिने केला आहे. अटकेवर नाराजी व्यक्त करत सोनू श्रीनिवास गौडा म्हणली, ‘चिमुकलीला घरी आणून अद्याप 15 दिवस देखील झाले नाहीत.’ मिळालेल्या माहितीनुसार, बालकल्याण समिती यावर अधिक तपास करत आहे.
सोनू श्रीनिवास गौडा हिने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने मुलगी दत्तक घेण्याचा खुलासा केला होता. व्हिडिओमध्ये मुलीच्या पालकांसोबतचा रेकॉर्ड केलेला फोनही होता. मात्र, सोनू श्रीनिवास गौडा यांच्याकडे दत्तक प्रक्रियेशी संबंधित आवश्यक माहिती नसल्याचे बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.