बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सर्वांचा आवडता अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. सलमान खानच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आलाय. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार करण्यात आला, त्यावेळी सलमान खान हा घरातच आपल्या कुटुंबियांसोबत होता. हेच नाही तर दोन दिवसांपूर्वीच ज्या गॅलरीत उभा राहून ईदच्या शुभेच्छा चाहत्यांना सलमान खान देताना दिसत होता, त्याच गॅलरीच्या आसपास हा गोळीबार करण्यात आलाय. हैराण करणारे म्हणजे एक गोळी सलमान खानच्या घरात गेल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
आता या प्रकरणात पोलिसांना महत्वाचे पुरावे मिळाल्याचे देखील सांगितले जातंय. हल्लेखोर हे दुचाकीवर आले होते. गोळीबारामध्ये हल्लेखोरांनी जी दुचाकी वापरली ती दुचाकी पोलिसांकडून जप्त करण्यात आलीये. आता या प्रकरणात अजूनही काही मोठे पुरावे पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जातंय. असे सांगितले जातंय की, हे आरोपी मुंबई सेंट्रलवरून आले होते.
हल्लेखोरांना मुंबईच्या रस्त्यांबद्दल काहीच माहिती नव्हती. हल्लेखोरांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला कसे जायचे हे ऑटोवाल्यांना विचारले होते. या आरोपींची शेवटची लोकेशन ही मुंबईतील विलेपार्ले परिसरातील दाखवत आहे. पुढे ते दहिसराला गेल्याचेही कळतंय. यामुळे हे स्पष्ट आहे की, हल्लेखोर मुंबईतील नसून इतर राज्यातील आहेत.
हे हल्लेखोर महबूब स्टूडिओच्या रस्त्यांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला गेले असल्याचे देखील सांगितले जातंय. आता या हल्लेखोरांचा अजून एक फोटो व्हायरल केला जातोय. या फोटोमध्ये दोन्ही हल्लेखोर दिसत आहेत. हेच नाही तर या फोटोंमध्ये हल्लेखोरांचा चेहरा स्पष्ट दिसतोय. दोघे एका मागून एक चालताना देखील दिसत आहेत.
सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. आता या प्रकरणाची चाैकशी केली जातंय. सलमान खानच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात आहेत. लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी ही घेण्यात आलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत.