Saif Ali Khan ला पोलीस विचारणार ‘हे’ 9 प्रश्न, समोर येणार मोठं सत्य? तुम्हीही जाणून घ्या

| Updated on: Jan 20, 2025 | 1:31 PM

Saif Ali Khan: गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खान याच्यावर उपचार सुरु आहेत. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून पोलीस अभिनेत्याचा जबाब नोंदवणार आहेत. अभिनेत्याला पोलीस 'हे' 9 प्रश्न विचारू शकतात. सध्या सर्वत्र सैफ अली खान याची चर्चा रंगली आहे.

Saif Ali Khan ला पोलीस विचारणार हे 9 प्रश्न, समोर येणार मोठं सत्य? तुम्हीही जाणून घ्या
Follow us on

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर सेलिब्रिटी सुरक्षित आहेत की नाही? यांसारखे अनेक प्रश्न समोर येत आहे. सैफ हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 50 लोकांचा जबाब नोंदवला आहे. अभिनेत्री करीना कपूर हिचा जबाब देखील नोंदवण्यात येत आहे. आता पोलीस सैफ अली खान याला देखील काही प्रश्न विचारणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पोलीस सैफ अली खान याचा जबाब नोंदवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण जबाब नोंदवण्यासाठी डॉक्टर परवानगी देतील की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर डॉक्टरांनी परवानगी दिल्यास पोलीस अभिनेत्याला 9 प्रश्न विचारतील असं देखील सांगण्यात येत आहे.

सैफ अली खानला पोलीस विचारू शकतात ‘हे’ प्रश्न

1. 16 जानेवारीच्या रात्री नक्की काय झालं होतं, घरात कोण कोण होतं?

हे सुद्धा वाचा

2. तू कुठे होतास आणि चोराबद्दल तुला कसं माहिती झालं.

3. जर तुम्ही चोराला पाहिलं तर, त्याच्या हातात कोणते शस्त्र होते?

4. घटना घडली तेव्हा तुझी मुलं, बायको आणि इतर स्टाफ कुठे होतं?

5. हल्ल्यानंतर चोराने घरातून कसा पळ काढला?

6. जखमी अवस्थतेत तुला रुग्णालयात कोणी आणलं?

7. चोराला कधी घराच्या आजू-बाजूल पाहिलं आहे?

8. काही संशयास्पद व्यक्ती तुमच्याकडे येत आहे असे तुम्हाला कधी वाटले आहे का?

9. घटनेच्या वेळी आणि रुग्णालयात जात असताना तुमच्याकडे बॉडीगार्ड होते की नाही?

चोरीच्या उद्देशाने घरात घुसला चोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने सैफ आणि करीना यांच्या घरात घुसला होता. इमारतीच्या सातव्या-आठव्या मजल्यावरून तो पायऱ्या चढून गेल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर खान त्याच इमारतीच्या 12व्या मजल्यावर मुलं आणि घरगुती कर्मचाऱ्यांसोबत राहतात.

पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

सैफ अली खान हल्ला प्रकरणात इमारतीतून तसेच घटनास्थळावरून आरोपी शेहजादचे 19 फिंगरप्रींट आतापर्यंत पोलिसांना सापडल्याची सूत्रांची माहिती. जिना, खिडकी, सदनिका अशा विविध ठिकाणी हाताचे ठसे सापडले असून आरोपीविरोधात हा भक्कम पुरावा ठरू शकतो. आता या प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.