‘या’ अभिनेत्रीची जाहिरात दूरदर्शनकडून बॅन; आमिर खानसोबत दिलेल्या लिप लॉक सीनमुळे सर्वत्र खळबळ

| Updated on: May 11, 2023 | 2:14 PM

आमिर खान याच्यासोबत लिप लॉक सीन... 'ती' जाहिरात... सावत्र आईबद्दल धक्कादायक वक्तव्य; कायम वादग्रस्त प्रकरणांमुळे बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री चर्चेत....

या अभिनेत्रीची जाहिरात दूरदर्शनकडून बॅन; आमिर खानसोबत दिलेल्या लिप लॉक सीनमुळे सर्वत्र खळबळ
Follow us on

मुंबई : झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्री कायम वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिल्या. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री आज झगमगत्या विश्वापासून दूर असल्या तरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. अभिनेत्रींचे प्रेम प्रकरण, वाद, त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच अभभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूजा बेदी. अभिनेते कबीर बेदी आणि प्रोतिमा बेदी यांनी 11 मे 1070 रोजी पूजा बेदी हिला जन्म दिला. पूजाने ‘विषकन्या’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण आई – वडिलांप्रमाणे तिला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. अभिनेत्री सर्वत्र चर्चेत तर राहिली, पण तिच्या अभिनयामुळे नाही तर, वादग्रस्त प्रकरणांमुळे…

अभिनेता आमिर खान याच्यासोबत पूजा बेदी हिने ‘जो जीता वही सिकंदर’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली तेव्हा अभिनेत्री तुफान चर्चेत आली. सिनेमात आमिर आणि पूजा यांच्यावर एक लिपलॉक सीन चित्रीत करण्यात आला होता. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. त्यानंतर अभिनेत्रीने फरहान फर्निचरवाला यांच्यासोबत लग्न केलं आणि इस्लाम धर्माचा स्वीकार केला. पण दोघांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. अखेन लग्नाच्या १२ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला…

हे सुद्धा वाचा

पूजा बेदी कायम तिच्या आयुष्यातील वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आली. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 1991 साली एका कॉन्डमच्या जाहिरातीत काम केलं होतं. या जाहिरातीमध्ये अभिनेत्री मॉडेल मार्क रॉलिन्सन याच्यासोबत दिसली होती. ही जाहिरात इतकी बोल्ड होती की, दूरदर्शनने जाहिरातीला बॅन केलं. याशिवाय 2011 साली पूजा बिग बॉसमध्ये देखील दिसली होती. शोमध्ये तिने सलमान खानवर पक्षपाती असल्याचा आरोप केला होता. पूजाच्या या बोलण्याने सलमानही चांगलाच संतापला होता.

अभिनेत्रीचे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत असलेले वाद देखील समोर आले. पूजाने स्वतःच्या वडिलांवर देखील निशाणा साधला होता. कबीर बेदी यांनी 2016 मध्ये त्यांची गर्लफ्रेंड परवीन दुसांजसोबत लग्न केलं, जे पूजाला अजिबात आवडलं नाही. त्यावेळी पूजाने या लग्नाला विरोध करत ट्विट केलं होतं. ट्विटमुळे देखील अभिनेत्री तुफान चर्चेत आली. ‘प्रत्येक परीकथेत एक दुष्ट सावत्र आई नक्कीच असते.’ असं ट्विट अभिनेत्रीने केलं होतं.

पूजाच्या या ट्वीटनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. सोशल मीडिया अनेक चर्चा रंगत असताना अभिनेत्री ट्विट डिलीट केलं. पूजा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.. पण आज अभिनेत्री तिचा वाढदिवस असल्यामुळे चर्चेत आली आहे…