Poonam Pandey Death News : कायम वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडे हिचं गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झालं आहे. वयाच्या 31 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्री पूनम पांडे हिचं गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झालं असून, 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-2025 चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, सरकार गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यास आवाहन करणार.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात सांगितले होते की, सरकार देशातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राज्ये आणि विविध आरोग्य विभागांच्या नियमित संपर्कात आहेत… अशी देखील माहिती समोर आली आहे. ‘सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी मोठी घोषणा केली होती.
आदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मी सर्वाइकल कॅन्सरपासून वाचण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींच्या भारत सरकारकडून करण्यात आलेल्या लसीकरणाच्या घोषणेचे स्वागत करतो. एचपीव्ही रोखण्यासाठी आणि लसीकरणासाठी प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी वचन द्या….’ सध्या पूनम पांडे हिच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
पूनम पांडे हिच्या निधनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीचं ज्या कॅन्सरमुळे निधन झालं आहे, त्याचं नाव सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर असं आहे. या कॅन्सरची शक्यता महिलांमध्ये अधिक असते. योनीमार्गातून असामान्य रक्तस्राव होणं, दोन मासिक पाळीदरम्यान, लैंगिक संबंधांदरम्यान किंवा रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून असामान्य द्रव स्रवणं, लैंगिक संबंधांदरम्यान खूप वेदना होणं अशी त्याची लक्षणं आहेत. यामु्ळे महिलांनी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.
पूनम हिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पूनम अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली होती होती. ‘लॉक अप’ या शोमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. सोशल मीडियावर देखील पूनम कायम सक्रिय होती. सोशल मीडियावर पूनम हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.