Poonam Pandey Death News : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली पूनम पांडे (Poonam Pandey) हिचं निधन झाले. सर्वाइकल कॅन्सरमुळे पूनम पांडे हिने वयाच्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 1 फेब्रुवारी रात्री अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. पूनम पांडे हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण अभिनेत्रीला ट्रोलिंगचा देखील मोठा सामना करावा लागला. पूनम हिला कायम तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे ट्रेलिंगचा सामना करावा लागला. पण निधनाच्या काही दिवसांपूर्वी पूनम हिने असं काम केलं, ज्यामुळे अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक झालं.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी भारतीयांनी मालदीव बहिष्कार टाकला होता आणि भारतीय द्वीप लक्षद्वीपला सेलिब्रिटींनी प्रमोट केलं. तर मालदीव याठिकाणी होणारे शुटिंग देखील भारतीयांनी रद्द केले. अक्षय कुमार, जॉन अब्राहम, कैलाश खेर, ईशा गुप्ता, अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी मालदीव नाही तर, लक्षद्वीप याठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, पूनम पांडे हिने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर काही काही स्क्रीनशॉट शेयर केले होते. ज्यामध्ये मालदीव याठिकाणी होणारी शुटिंग रद्द करण्यासाठी अभिनेत्री बोलताना दिसत आहे. स्क्रीनशॉट शेअर करत पूनम म्हणाली, ‘मला मालदीव याठिकाणी शूट करायला आवडतं. पण आता मी कधीच मालदीव याठिकाणी शुटिंग करणार नाही. जेव्हा मी मालदीवमध्ये माझं पुढचं शूट शेड्यूल केलं तेव्हा मी टीमला सांगितलं की जर शूट मालदीवमध्ये अडकले तर मी शूट करणार नाही…’ सध्या सर्वत्र पूनम हिची चर्चा रंगली आहे.
पूनम पांडे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, पूनम एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय मॉडेल होती. 2011 क्रिकेट विश्वचषक फायनलपूर्वी, तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून एक वचन दिलं होते. जर भारताने अंतिम सामना जिंकला तर ती तिचे कपडे काढेल.. ज्यामुळे पूनम तुफान चर्चेत आली होती. तेव्हा पहिल्यांचा पूनम चर्चेत आली होती.
पूनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची. अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ‘लॉक अप’ सिझनमध्ये देखील अभिनेत्री स्पर्धक म्हणून होती. अभिनेत्री शो जिंकू शकली नाही. पण ‘लॉक अप’ या शोमुळे तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूनम पांडे हिच्या निधनाची चर्चा रंगली आहे.