अभिनेता इमरान हाश्मी याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण अभिनेत्यानेत करियरची सुरुवार सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. त्यानंतर इमरान हाश्मी याने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुटपाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण अभिनेत्याला यश मिळालं नाही. सिनेमा देखील फ्लॉप ठरला. पहिला सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्याने तीन वर्ष ब्रेक घेतला आणि 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘मर्डर’ सिनेमानंतर इमरान याच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमात अभिनेत्याने अनेक किसिंग सीन दिले आणि इमरान हाश्मी बॉलिवूडचा ‘सिरियल किसर’ झाला.
नुकताच झालेल्या मुलाखतीत इमरान हाश्मीने यावर मोठं वक्तव्य केलं. प्रत्येक अभिनेत्याचा एक वेगळा पेटेंट असतो आणि तशी अभिनेत्याची ओळख निर्माण होते. मग त्या ओळखीमुळे एखादा कलाकार अभिनेता होतो. , शाहरुख खानचा उल्लेख करत इमरान म्हणाला, शाहरुख खानची कारकीर्द चमकदार आहे. शाहरुख रोमान्सचा बादशाह आहे तर, सलमान खान सिनेमांमध्ये शर्टलेस सीन देतो म्हणून प्रसिद्ध आहे.
पुढे अभिनेता म्हणाला, ‘प्रत्येत अभिनेत्याकडे एक लेबल असतो. ज्यामुळे त्याची ओळख निर्माण होते. यासाठी मी प्रेक्षकांना दोष देत नाही. 2009 पर्यंत माझ्या कारकिर्दीचा हा मोठा भाग होता. 7-8 वर्षांपासून, माझी हीच प्रतिमा निर्माते विकत होते. मी ते स्वतः विकत होतो…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
इमरान हाश्मी याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘शो’ टाईम वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला होता. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री मौनी रॉय हिने स्क्रिन शेअर केली होती. तर ‘टायगर 3’ मध्ये देखील इमरान हाश्मी याने खलनायकाची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती.