मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | अभिनेते नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नाना पाटेकर यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहत असतात. आता नाना पाटेकर लवकरच दिग्दर्शिक विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. दरम्यान, नाना पाटेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं, नाना पाटेकर फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, परखड वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर नाना पाटेकर स्वतःचं मत मांडत असतात. एवढंच नाही, अनेक चाहते नाना पाटेकर यांच्या मताचा, वक्तव्याचं समर्थन देखील करतात.
नुकताच झालेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मृत्यूबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पाटेकर यांचा मृत्यूवर विश्वास आहे. मृत्यूनंतर नाना पाटेकर यांना १२ मन लाकडं लागतील असं वक्तव्य खुद्द त्यांनी एका मुलाखती दरम्यान केलं आहे. एवढंच नाही तर, ‘हिच माझी खरी संपत्ती…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले..
नाना पाटेकर म्हणाले, ‘मी माझ्यासाठी १२ मन लाकडं ठेवली आहेत आणि कोणताच लाकूड ओला नाही. माझ्या अंत्यसंस्कारासाठी ओली लाकडं वापरू नका, नाही तर सर्वत्र धूर होईल. जे पाहुणे आणि मित्रमंडळी तेथे उपस्थित असतील त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल. अशात अनेकांचा गैरसमज होईल की, जमलेले सगळे माझ्यासाठी रडत आहेत…’
पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘माझ्या निधनाच्या वेळी कोणता गैरसमज नको अशी माझी इच्छा आहे. तुमचं निधन होईल, पण कोणी तुम्हाला २ – ४ दिवस देखील आठवणीत ठेवणार नाही. माझ्या निधनानंतर माझा फोटो देखील नका लावू. मला पूर्णपणे विसरून जा… तेच अत्यंत महत्त्वाचं आहे…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.
भावंडांबद्दल नाना पाटेकर म्हणाले, ‘आम्ही सात भावंडं होतो. सर्वांचं निधन झालं आहे. मी एकटाच आहे. आई वडील, भाऊ बहीण आता कोणी नाही. आता मी या जगात एकटा आहे.’ सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, रायमा सेन, निवेदिता भट्टाचार्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.