Bollywood Actress: वयाच्या १७ व्या वर्षी अभिनेत्रीचं पहिलं लग्न, तिसरं लग्न तुटल्यानंतर आता जगतेय ‘असं’ आयुष्य

| Updated on: Jul 05, 2023 | 3:45 PM

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुर्दैव; तीन प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत 'प्रेमसंबंध', पण तीघांनी अर्ध्यावर सोडली अभिनेत्रीची साथ... आज जगते 'असं' आयुष्य

Bollywood Actress: वयाच्या १७ व्या वर्षी अभिनेत्रीचं पहिलं लग्न, तिसरं लग्न तुटल्यानंतर आता जगतेय असं आयुष्य
Follow us on

मुंबई | बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली. प्रेमासारखी गोष्ट आभिनेत्रींच्या आयुष्यात आल्यामुळे त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली… पण अनेक अभिनेत्रींच्या आयुष्यात प्रेम ही भावना अनेक वर्ष राहिली नाही. अभिनेत्रींनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम तर केलं. पण अर्ध्यावर जोडीदाराने साथ सोडली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. तिच्या आयुष्यात एक दोन नाही तर, तीनवेळा प्रेमाची एन्ट्री झाली. पण तिनही सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचं नातं टीकलं नाही. वयाच्या १५ व्या वर्षी प्रेम आणि १७ व्या लग्न केल्यानंतर काही वर्षात अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. आज अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर एकटी आयुष्य जगत आहे…

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. प्रेम झाल्यामुळे लग्नाचा निर्णय घेतला. पण लग्न अधिक काळ टिकू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेतला. प्रेमात दुर्दैव असलेल्या अभिनेत्रीचं नाव निलीमा अझीम (Neelima Azeem Marriage) असं आहे.

रिपोर्टनुसार, निलीमा जेव्हा फक्त १५ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांची ओळख पंकज कपूर (Pankaj Kapoor) यांच्यासोबत झाली. कालांतराने निलीमा आणि पंकज यांच्या भेटीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर पंकज आणि निलीमा यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

वयाच्या १७ व्या वर्षी निलीमा यांनी २२ वर्षीय पंकज यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या ६ वर्षांनंतर निलीमा यांनी मुलाला जन्म दिला आणि पंकज कपूर वडील झाले. पंकज आणि निलीमा यांचा मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. निलीम आणि पंकज यांच्या मुलाचं नाव शाहिद कपूर असं आहे. निलीमा यांनी १९८१ साली शाहिद कपूर याचा जन्म झाला आणि १९८४ साली पंकज आणि निलीमा यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर निलीमा आझमी यांनी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलाचा सांभाळ केला. पकंज कपूर यांना घटस्फोट दिल्यानंतर अनेक वर्षांनी अभिनेत्रीची ओळख अभिनेते राजेश खट्टर (Rajesh Khattar) यांच्यासोबत झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर १९९० साली राजेश अणि निलीमा यांनी लग्न केलं..

लग्नाच्या पाच वर्षांनंतर निलीमा यांनी राजेश खट्टर यांच्या मुलाला जन्म दिला. १९९५ साली राजेश खट्टर यांच्या घरात ईशान खट्टर याचा जन्म झाला. पण राजेश आणि निलीमा यांचं नातं देखील फार वर्ष टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी २००१ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

रिपोर्टनुसार, राजेश खट्टर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर निलीमा आझमी यांनी राजा अली खान यांच्यासोबत लग्न केलं. पण राजा अली खान यांच्यासोबत देखील निलीमा आझमी यांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. राजा अली खान आणि निलीमा यांनी २००४ साली लग्न केले आणि दोघांनी २००९ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

वैवाहिक आयुष्यात सतत येत असलेल्या अपयशामुळे निलीमा आज एकट्या जगत आहेत. आता निलीमा कायम शहिद कपूर आणि ईशान खट्टर यांच्यासोबत वेळ व्यतीतकरताना दिसत असतात. सध्या सर्वत्र निलीमा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.