मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांच्यावर कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. आता या मालिकेतील मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis) हिने देखील आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये म्हटंले आहे की, मी गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनमध्ये काम करते आहे. (Post shared by actress Mrunal Dusanis against Mandar Devasthali)
मी कधीही कोणत्याही निर्मातांचे पैसे बुडवले नाहीत किंवा कोणत्या निर्मात्याने माझे पैसे बुडवले नाहीत. मात्र, मला अशा एक अनुभव आला आहे ते म्हणजे प्रसिद्ध निर्माता @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले आहेत. अशाप्रकारची पोस्ट शेअर करून मृणाल दुसानीस हिने मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. यामुळे याप्रकरणात निर्मात्याच्या विरोधात सर्व कलाकार एकवटले असल्याचे दिसत आहे.
कोण आहेत मंदार देवस्थळी?
मंदार देवस्थळी हे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील बड्या आणि प्रथितयश नावांपैकी एक आहे. मंदार देवस्थळी यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. यापैकी अनेक मालिका लोकप्रियही ठरल्या होत्या. यामध्ये ‘बोक्या सातबंडे’, ‘आपली माणसं’,’झुंज’, ‘आभाळमाया’, ‘किमयागार’, ‘वसुधा’,’खरंच माझं चुकलं का???’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’,’जिवलगा’, ‘मायलेक’, ‘कालाय तस्मैनम:’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, अशा मालिकांचा समावेश आहे.
मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अडचण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मोबदला हा भीक मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का, असा प्रश्नही मृणाल दुसानीस उपस्थित केला आहे.
संबंधित बातम्या :
‘आभाळमाया’, ‘होणार सून…’ ते ‘मन बावरे’, मराठी मालिका विश्वात दबदबा, कोण आहेत मंदार देवस्थळी?
आपल्याच मेहनतीचा पैसा भीक मागितल्यासारखा मागणं योग्य आहे का?, संग्राम समेळचा संतप्त सवाल…
(Post shared by actress Mrunal Dusanis against Mandar Devasthali)