कोरोना महामारीनंतर देशात यंदा सर्व सणवार मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती उत्सवानंतर आता कोरोनामुळे तब्बल २ वर्षांनंतर साजऱ्या होत असलेल्या दसऱ्याच्या सणाला खूप सणाचे वेध लागले आहेत. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या (Red fort)मैदानावर भव्य दसऱ्याचे आयोजन केले जाते. येथील रामलीलाही (Ramleela)खूप ही प्रसिद्ध आहे. आयोजन केले जाते. कोरोनामुळे (Corona)यामध्ये खंड पडला होता. मात्र यंदा ही रामलीलाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यासाठी आयोजकांनी भव्य रामलीला समारंभाचे आयोजन केलं आहे. देशात प्रसिद्ध असलेल्या या रामालीला अनेक कलाकार हजेरी लावतात. यावर्षीच्या रामलीलासाठी दाक्षिणात्य अभिनेता व बाहुबली फेम प्रभास (Pabhas)याला बोलावण्यात आले आहे. प्रभासची उपस्थिती चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय आहे.
लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार म्हणाले यानी दिलेल्या माहितीनुसार प्रभासने दसऱ्याचे आमंत्रण स्वीकारले असून तो 5 ऑक्टोबरला होणाऱ्या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार म्हणाले, “प्रभास हा बाहुबलीनंतरचा आजचा सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावावे असे ठरले. आम्ही त्यांना आमंत्रण पाठवले असून त्यांनी ते स्वीकारलेही आहे.
व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास प्रभास शेवटचा त्याच्या ‘राधे श्याम’ चित्रपटात दिसला होता. आता लवकरच तो ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती सेनन सीता तर सैफ अली खान लंकेश रावणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाशिवाय प्रभास ‘केजीएफ’ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या ‘सालार’ या चित्रपटातही दिसणार आहे.