मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आनंद मिळतो, तर व्हिडीओ पाहिल्यानंतर मोठा धक्का बसतो. आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. रस्त्यावर भीक मागताना दिसत असलेला व्यक्ती प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. पण व्हिडीओमध्ये अभिनेत्याची अवस्था पाहून रस्त्यावर चालत असलेले लोकं घाबरले… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या मोठमोठे फोड आहेत. टेंगुळ आहेत. मागून कुबड आलेलं दिसत आहे. अभिनेत्याची चेहरा पाहून अनेक जण घाबरले आणि त्यांनी पळ काठला… पण एक रिक्षावाल्याने अभिनेत्याला मदत केली. व्हिडीओमध्ये दिसणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, बिग बॉस मराठी 2 चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरे आहे.
शिव ठाकरे याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिव याने चाहत्यांसोबत एक प्रॅन्क केला आणि अभिनेत्याचा प्रॅन्क यशस्वी ठरला आहे. शिव ठाकरे मेकअप करून चाहत्यांच्या समोर आला. टॅक्सीतून उतरल्यानंतर अभिनेत्याने सर्वांसोबत प्रॅन्क करण्यास सुरुवात केली.
व्हिडीओवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे. शिव याच्या व्हिडीओवर एक चाहता कमेंट करत म्हणाला, ‘रिक्षावाल्या काकांनी मन जिंकलं…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘क्या बात है शिव…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मराठी माणूस कायम मदतीसाठी पुढे…’, ‘आपली मराठी माणसं…’ अशा अनेक कमेंट अभिनेत्याच्या व्हिडीओवर येत आहेत.
सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त शिव ठाकरे याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. शिव ठाकरे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शिव याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फक्त मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही तर, शिव याने हिंदी टीव्ही विश्वात देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘बिग बॉस 16’ मुळे देखील शिव तुफान चर्चेत आला होता.
शिव याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्साही असतात. शिव देखील चाहत्यांना नाराज करत नाही, चाहत्यांसोबत अभिनेता सेल्फी घेताना दिसतो. सोशल मीडियावर देखील शिव याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिव देखील सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.