‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम तसेच लेखक, दिग्दर्शक, निर्माता , अभिनेता प्रसाद खांडेकर याने नुकताच आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुख्य म्हणजे प्रसादने या पोस्टद्वारे आपल्या पत्नीवरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
प्रसाद खांडेकरची आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट
आपल्या सहजीवनाच्या आठवणींना उजाळा देत प्रसादने बायकोसाठी गिफ्टची निवड करत तिला लॅपटॉप भेट दिला आहे. त्याच वेळी अल्पा खांडेकरने रिटर्न गिफ्ट म्हणून प्रसादला एक खास दागिना भेट दिला आहे. प्रसादने केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रसाद खांडेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही प्रसाद सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतंच अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोसाठी खास पोस्ट केली आहे. प्रसादने बायको अल्पा खांडेकरबरोबरचे फोटो शेअर करून ही खास पोस्ट लिहिली आहे.
लग्नाच्या वाढदिवसादिवशी पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त
प्रसाद आणि पत्नी अल्पा य़ांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रसादने या पोस्टमध्ये बायकोवरील प्रेम व्यक्त करत लग्नापासून ते आतापर्यंतच्या प्रवास त्याने त्याच्या शब्दात या पोस्टद्वारे शेअर केला आहे.
प्रसादने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी अल्पाबरोबरचा फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको… तुझ्या साथीने आयुष्यातील अनेक टप्पे पार करता आले. तुझं प्रोत्साहन आणि समजूतदारपणा मला कायम पुढे जाण्याची ऊर्जा देतो. प्रेमाची 9 वर्ष आणि लग्नाची 11 वर्ष. एकूण 20 वर्ष कशी गेलीत कळलं नाही” असं लिहीत त्याने नंतर एक कविता लिहिली आहे.
पत्नीला वाढदिवसाचं खास गिफ्ट
त्यानंतर त्याने पुढे लिहिलं आहे की,”या आणि अशा कित्येक प्रवासात बरोबर राहिली आहेस…म्हणून इथंपर्यंत पोहोचलोय आय लव्ह यू सो मच मिसेस खांडेकर.अल्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशीच बरोबर राहा आणि हसत राहा…अप्पू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर” असं लिहित प्रसादने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसादच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसाद आणि अल्पा यांनी एकमेकांना दिलेल्या गिफ्टने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसादने पत्नीला लॅपटॉप गिफ्ट म्हणून दिला आहे तर अल्पानेही प्रसादला एक दागिना रिर्टन गिफ्ट म्हणून दिला आहे. याचे फोटोही प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट केले असून चाहत्यांनी त्याला पसंती दर्शवली आहे.
दरम्यान अल्पा खांडेकर या व्यवसायिक असून ‘स्वीट मेमोरीज’ या नावाने केक आणि चॉकलेट तयार करण्याचा व्यवसाय सांभाळतात. प्रसादनेही अनेकदा तिच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या सहजीवनातील सुसंवाद आणि परस्पर आदर याचा उल्लेख त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट दिसतो.
नव्या नाटकाची घोषणा
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्टची चर्चा होत असतानाच प्रसादने आपल्या नव्या नाटकाची घोषणाही केली आहे. ‘थेट तुमच्या घरातून’असे या नाटकाचे नाव असून यामध्ये प्रसादसोबत शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर, आणि नम्रता संभेरावर यांच्या भूमिका आहेत. या नाटकाचा शुभारंभ प्रयोग २१ डिसेंबर रोजी होणार आहे.