Prasad Oak | “दिघे साहेब”… असेच कायम पाठीशी रहा’, प्रसाद ओक यांची ‘धर्मवीर 2’ बद्दल मोठी घोषणा

| Updated on: May 13, 2023 | 2:27 PM

'धर्मवीर २' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला... प्रसाद ओक यांच्या खास पोस्टनंतर सर्वत्र चर्चांना उधाण, धर्मवीर 2' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर काय येणार?

Prasad Oak | दिघे साहेब... असेच कायम पाठीशी रहा, प्रसाद ओक यांची धर्मवीर 2 बद्दल मोठी घोषणा
Follow us on

मुंबई : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) सिनेमाने अनेक विक्रम मोडले. प्रेक्षकांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतलं. आजही सिनेमाची आणि सिनेमातील गाण्यांची तुफान चर्चा रंगलेली असते. जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे आनंद दिघे (Anand Dighe). आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि सिनेमाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिला अभिनेते प्रसाद ओक यांनी न्याय दिला. आज ‘धर्मवीर’ सिनेमाला प्रदर्शित होवून एक वर्ष झाला आहे.

सिनेमाला प्रदर्शित होवून वर्ष लोटला आहे. अशात प्रसाद ओक यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ‘धर्मवीर २’ सिनेमाबद्दल मोठी घोषणा केली आहे. ‘धर्मवीर’ सिनेमाच्या तयारीदरम्यानचा मेकिंग व्हिडीओ पोस्ट करत प्रसाद ओक यांनी खास कॅप्शन लिहिलं आहे. सध्या प्रसाद ओक यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

व्हिडीओ पोस्ट करत प्रसाद ओक म्हणाले, ‘”धर्मवीर” माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय…!! या भूमिकेनी, या चित्रपटानी मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांत जी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि धर्मवीर च्या संपूर्ण टीम चे अत्यंत मनःपूर्वक आभार…!!!’

प्रसाद ओक पुढे म्हणाले, ‘ रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार…!!! धर्मवीर – भाग 2 ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी आशा करतो…!!! “दिघे साहेब”… असेच कायम पाठीशी रहा…’ असं म्हणत प्रसाद ओक यांनी ‘धर्मवीर 2’ सिनेमाबद्दल मोठी घोषणा केली आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमात आनंद दिघे यांचं रुग्णालयात निधन झाल्याचं दाखवण्यात आलं. आता ‘धर्मवीर 2’ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर काय येणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता प्रेक्षक ‘धर्मवीर 2’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रसाद ओक यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.