प्रेमाची कबुली दिल्यानंतर पुन्हा जुळले प्रथमेश आणि मुग्धा यांचे सूर, नवा व्हिडिओ आला समोर

| Updated on: Jun 20, 2023 | 12:23 AM

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. दोघांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचा हा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

प्रेमाची कबुली दिल्यानंतर पुन्हा जुळले प्रथमेश आणि मुग्धा यांचे सूर, नवा व्हिडिओ आला समोर
Follow us on

मुंबई : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र येणार आहेत. प्रथमेशनं फेसबुकवर पोस्ट लिहित मुग्धासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. त्यानंतर प्रथमेश आणि मुग्धा यांचे सूर पुन्हा एकदा जुळले आहे. त्यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. दोघे ही एकत्र गाणं गाताना दिसत आहेत. प्रथमेशने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठी या शोमध्ये मुग्धा आणि प्रथमेश एकत्र आले होते. दोघांमध्ये पुढेही चांगली मैत्री झाली. प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केलं होतं. प्रथमेश कधी ना कधी प्रपोज करणार, याची जाणीव मुग्धाला होती. त्यानंतर दोघे ही एकत्र आले. दोघे ही एकमेकांना आता डेट करत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय. दोघांच्या रिलेशनशिपबद्दल कुटुंबीयांना कल्पना होतीच. मुग्धाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. अखेर ठरवून दोघांनी एकाच वेळी आपापल्या कुटुंबीयांना सांगितलं.

मुग्धा आणि प्रथमेश यांनी एक गाणं गायलं आहे. त्यांचा हा नवीन व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे ही एक भक्तीगीत गातांना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करत प्रथमेश याने म्हटले की, आज परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी! त्यानिमत्ताने त्यांनीच रचलेल्या करुणात्रिपदीचा काही भाग त्यांच्या चरणी अर्पण करतोय! “शांत हो श्री गुरुदत्ता”