Prathamesh Parab | ‘सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही…’, लग्नाआधी प्रथमेश परबच्या होणाऱ्या पत्नीची लक्षवेधी पोस्ट

| Updated on: Feb 24, 2024 | 9:25 AM

Prathamesh Parab | 'सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही...' लग्नाआधी प्रथमेश परबच्या होणाऱ्या पत्नी पोस्ट, अभिनेता उत्तर देत म्हणाला, 'तुला दोन्ही घर...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रथमेश आणि क्षितीजा यांच्या लग्नाची चर्चा

Prathamesh Parab | सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही..., लग्नाआधी प्रथमेश परबच्या होणाऱ्या पत्नीची लक्षवेधी पोस्ट
Follow us on

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : ‘टाईमपास’ सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेला आणि ‘मला वेड लागले प्रेमाचे…’ म्हणत प्रेमाची व्याख्या समजावणाऱ्या प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 24 फेब्रुवारी म्हणजे आज प्रथमेश याचं लग्न होणार आहे. प्रथमेश याच्या साखरपुड्याचे आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता प्रथमेश याची होणारी पत्नी क्षितीजा घोसाळकर हिने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

लग्नाआधील क्षितीजा घोसाळकर हिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीजा घोसाळकर हिने घरा बाहेरुन दोन फोटो पोस्ट केले आहेत. ज्या घरात संपूर्ण बालपण गेलं, त्या घराचा आता निरोप घ्यावा लागणार म्हणून क्षितीजा घोसाळकर भावूक झाली.

हे सुद्धा वाचा

माहेरच्या घराचे फोटो पोस्ट करत क्षितीजा घोसाळकर म्हणाली, ‘आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर… आजपर्यंत , तुझी “माझं घर”, अशी असलेली ओळख आता “माझं माहेर”, अशी होणार आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार..’

 

 

‘तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळालाय!! बघ ना, काही मनसोक्त हसतायत.. काही अलवार रडतायत.. काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय, तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल!!!’

‘त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार! सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला… तुही मग तयार रहा, आपलं नेहमीचं हितगुज करायला… सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल.’ क्षितीजा घोसाळकर हिची पोस्ट प्रत्येक विवाहित महिलेसाठी आणि ज्याच्या लग्नाची तयारी सुरु आहे… त्यांच्यासाठी फार खास आहे.

क्षितीजा घोसाळकर हिच्या पोस्टवर प्रथमेश याने फार सुंदर उत्तर दिलं आहे. प्रथमेश होणाऱ्या बायकोला म्हणाला, ‘किती छान… तुला इकडे एवढं प्रेम देऊ की तुला दोन्ही घर आपली वाटतील… आय लव्ह यू…’, अभिनेत्याने दिलेलं उत्तर देखील चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे.

सांगायचं झालं तर, क्षितीजा घोसाळकर आणि प्रथमेश परब याचं लव्हमॅरेज आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. सर्वप्रथम क्षितीजा आणि प्रथमेश यांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. चाहत्यांना देखील क्षितीजा आणि प्रथमेश यांची जोडी प्रचंड आवडली. आता सर्वत्र क्षितीजा आणि प्रथमेश यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.