मुंबईते लॉस एंजेलिसपर्यंत साम्राज्य, बॉलिवूडपासून दूर राहून ‘ही’ अभिनेत्री अफाट संपत्तीची मालकीण

| Updated on: Jan 31, 2024 | 2:13 PM

Actress Life : 'या' अभिनेत्रीने एकेकाळी बॉलिवूड गाजवलं, अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर, तरी अफाट संपत्तीची मालकीण, भारतातच नाही तर, परदेशात देखील तिचं मोठं साम्राज्य... अभिनेत्री तिच्या गडगंज संपत्तीमुळे तुफान चर्चेत

मुंबईते लॉस एंजेलिसपर्यंत साम्राज्य, बॉलिवूडपासून दूर राहून ही अभिनेत्री अफाट संपत्तीची मालकीण
Follow us on

मुंबई | 31 जानेवारी 2024 : बॉलिवूड खोडकर , डिंपल गर्ल अभिनेत्री प्रिती झिंटा आज बॉलिवूडपासून दूर आहे. एक काळ असा होता, जव्हा सर्वत्र फक्त आण फक्त प्रिती झिंटा हिची चर्चा रंगलेली असायची… अभिनेता शाहरुख खान याच्यापासून प्रिती हिने सलमान खान, आमिर खान यांच्यासोबत काम केलं आहे. अनेक हीट सिनेमे प्रिती हिने बॉलिवूडला दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. अभिनय क्षेत्रात प्रिती सक्रिय नसली तरी, अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करते.

लग्नानंतर प्रिती झिंटा भारतात नाही तर, पती जीन गुडइनफसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, अभिनेत्री गडगंज संपत्तीची मालकीण आहे. लाईफस्टाईल एशियाच्या रिपोर्टनुसार, प्रिती झिंटाची एकूण संपत्ती 183 कोटी रुपये आहे. अभिनेत्री असण्यासोबतच प्रिती एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे.

आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाची सहमालक असण्यासोबतच प्रिती झिंटा निर्माती देखील आहे. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंटही करते. मिळालेल्या माहितीनुसार प्रिती एका एंडोर्समेंटसाठी सुमारे दीड कोटी रुपये घेते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर प्रिती हिला तब्बल 11 मिलियन नेटकरी फॉलो करतात.

हे सुद्धा वाचा

प्रिती झिंटा हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, मुंबईपासून कॅलिफोर्नियापर्यंत प्रिती हिचं साम्राज्य आहे. मुंबई अभिनेत्रीचे अनेक आलिशान घरं आहेत.. 2023 मध्ये अभिनेत्रीने मुंबईतील पाली हिल येथे एक प्रॉपर्टी खरेदी केली. रिपोर्ट्सनुसार, प्रितीने या घरासाठी 17 कोटी रुपये दिले. याशिवाय अभिनेत्रीचे हिमाचल प्रदेशातील शिमला येथे एक घर आहे, जिथे तिचा जन्म झाला. या मालमत्तेची किंमत अंदाजे 7 कोटी रुपये आहे.

लग्नानंतर प्रिती झिंटा तिच्या पतीसोबत लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे राहते. बेव्हरली हिल्समध्ये दोघांचं स्वतःचं घर आहे. याशिवाय प्रिती एका स्टुडिओचीही मालकीण आहे, ज्याची किंमत जवळपास 600 कोटी रुपये आहे. प्रिती झिंटा रॉयल आयुष्य जगते. एवढंच नाही तर, अभिनेत्री दोन मुलांची आई आहे.

प्रिती झिंटा हिच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे लेक्सस एलएक्स 470 क्रॉसओवर ही महागडी कार आहे. शिवाय अभिनेत्रीकडे अनेक महागड्या गाड्या आहे. प्रिती हिच्याकडे पोर्श, मर्सिडीज बेंज ई क्लास आणिनबीएमडब्ल्यू यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.