अभिनेत्री प्रिती झिंटा आता तिच्या कुटुंबासोबत परदेशात आनंदाने आयुष्य जगत आहे. अभिनेत्रीने लग्नानंतर सरोगेसीच्या मदतीने जुळ्या मुलांचं जगात स्वागत केलं आहे. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात व्यक्त असली तरी, भूतकाळातील रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना अभिनेत्रीने अनेकांना डेट केलं आहे. अनेक क्रिकेटर आणि अभिनेत्यासोबत प्रिती झिंटा हिच्या नावाची चर्चा रंगली आहे. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. प्रिती झिंटा हिच्या अफेअर्सची यादी फार मोठी आहे.
रिपोर्टनुसार, सर्वात आधी प्रिती झिंटा हिचं नाव अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासोबत जोडण्यात आलं. ‘कभी अलविदा न कहना’ आणि ‘झूम बराबर झूम’ सिनेमामुळे अभिषेक आणि प्रिती यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत. असं दोघांनी देखील अनेकदा सांगितलं.
अभिषेक बच्चन याच्यानंतर प्रितीचं नाव ऑस्ट्रिलियन क्रिकेटर ब्रेट ली याच्यासोबत जोडू जाऊ लागलं. पण प्रितीने ऑस्ट्रिलियन क्रिकेटर ब्रेट ली याच्यासोबत असलेल्या नात्याचा देखील कधी स्वीकार केला नाही. ऑस्ट्रिलियन क्रिकेटर ब्रेट ली याने देखील कधीच प्रितीसोबत असलेल्या नात्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
प्रिती झिंटा आणि अभिनेता-मॉडेल मार्क रॉबिन्सन यांच्यातील नातेही मैत्रीच्या पलीकडच्या होतं… अशी देखील अनेकदा चर्चा रंगली. अफेअर प्रमाणेच दोघांच्या ब्रेकअपच्याही चर्चा रंगू लागल्या. नेस वाडिया आणि प्रितीच्या लिंकअपच्या खूप चर्चेत होत्या. दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते, पण 2009 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
आयपीएल दरम्यान, प्रिती आणि युवराज सिंग यांच्या मैत्रीची देखील तुफान चर्चा रंगली. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील रंगू लागल्या. पण दोघांनी देखील नात्याचा सर्वांसमोर स्वीकार केला नाही. त्यानंतर प्रिती हिच्या नावाची चर्चा अभिनेते आणि निर्माते शेखर कपूर यांच्यासोबत रंगू लागली.
धक्कादायक गोष्ट म्हणजे शेखर कपूर यांच्या पत्नीने प्रिती हिच्यावर संसार मोडल्याचे देखील आरोप केले होते. अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर प्रिती हिने परदेशातील उद्योजक जीन गुडइनफ याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
जीन गुडइनफ आणि प्रिती झिंटा यांनी 28 फेब्रुवारी 2015 मध्ये अमेरिकेत लग्न केलं. लग्नानंतर 2021 मध्ये अभिनेत्रीने सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांच जगात स्वागत केलं. अभिनेत्री आता मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.