महिलांची इज्जत जाते तेव्हा…, कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्येप्रकरणी सेलिब्रिटींमध्ये संतापाची लाट

| Updated on: Aug 16, 2024 | 9:09 AM

Kolkata Case: नराधमांचा चेहरा का लपवला जोतो..., कोणत्याच ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत... नराधमांना फाशीची शिक्षा..., कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरण... संतापजनक पोस्ट करत सेलिब्रिटींकडून दुःख व्यक्त, सध्या सर्वत्र धक्कादायक प्रकरणाची चर्चा...

महिलांची इज्जत जाते तेव्हा..., कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्येप्रकरणी सेलिब्रिटींमध्ये संतापाची लाट
Follow us on

कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. फक्त सामान्य जनताच नाही तर, याप्रकरणी सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला आहे. घडलेल्या संतापजनक घटनेनंतर देशात पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणी बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. नराधमांचा चेहरा का लपवला जातो? असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे. प्रिती झिंटा, समांथा रुथ प्रभू, जिनिलीया डिसूजा, कृति सनॉन आणि ऋतिक रोशन यांनी पोस्ट केली आहे.

नुकताच जिनिलीया देखील एक्सवर ट्विट करत म्हणाली, ‘राक्षसांना फाशीवर लटकवलं पाहिजे… त्या मुलीने जे काही सहन केलं आहे, ते वाचून माझा थरकाप उडाला आहे. एक महिला… सर्वांच्या प्राणाची रक्षा करणारी महिला तिचं कर्तव्य बजावत होती…तिला सेमिनार हॉलमध्ये सामना करावा लागला आहे. माझं मन तिच्या कुटुंबियांसाठी दुःखी आहे… मी कल्पना देखील करु शकत नाही की, तिने कसा सामना केला असेल…’

 

 

जिनिलीया हिच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन याने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. ‘आपल्याला अशा समाजात विकसित होण्याची गरज आहे, जेथे सर्वांना सुरक्षित वाटेल… पण यासाठी आणखी अनेक वर्ष लागतील… आपल्या मुला-मुलींना सक्षम करूनच हे शक्य होईल…. पुढच्या पिढ्या चांगल्या होतील. आपण तिथे पोहोचू. पण मधे काय होणार? हे थांबवण्यासाठी अशा गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल इतकी कठोर शिक्षा द्यावी लागेल. हे आपण केले पाहिजे. कदाचित?’ असं हृतिक म्हणाला आहे.

 

‘आपल्या माता – बहिणींच्या न्याय हक्कासाठी मी कायम पडीत कुटुंबियांसोबत आहे. मी त्या सर्व डॉक्टरांसोबत आहे ज्यांनी रात्री धक्कादायक घटनेचा सामना केला आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

अभिनेत्री प्रिती झिंटाने देखील कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्येप्रकरणी आवाज उठवला आहे. ‘आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. या निवडणुकीत पुरुष आणि महिला मिळून 66 टक्के मतदान झालं आहे. पुढच्या निवडणुकीत महिला पुरुषांच्या पुढे असतील… असं म्हणायला हरकत नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली.

 

 

पुढे प्रिती म्हणाली, ‘प्रचंड यातना होतात जेव्हा नराधमाचा चेहरा झाकला जातो आणि त्यानंतर त्याला अटक केली जाते. जर बलात्कार करणं गुन्हा आहे तर, नराधमाचा चेहरा आणि नाव मीडियाला दाखवायला हवा… जेव्हा स्त्रियांची इज्जत जाते, तेव्हा कोणीही काळजी घेत नाही. जोपर्यंत ते तुमच्यासोबत होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही… अशा कठोर शब्दांमध्ये प्रितीने घडलेल्या घटनेला विरोध केला आहे.