New Year 2023: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलियाने घातला इतका महागडा ड्रेस?

| Updated on: Jan 01, 2023 | 5:05 PM

New Year सेलिब्रेशनसाठी आलिया भट्टने घातलेला ड्रेस इतका महाग? किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

New Year 2023: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलियाने घातला इतका महागडा ड्रेस?
New Year 2023: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलियाने घातला इतका महागडा ड्रेस?
Follow us on

Alia Bhatt New Year 2023: शनिवारी प्रत्येकाने नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं. २०२२ वर्षाला अखेरचा निरोप देत सर्वसामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी देखील नव्या वर्षाचं स्वागत केलं. बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्टने देखील नव्या वर्षाचं स्वागत अभिनेता – पती रणबीर कपूरसह कुटुंब आणि मित्र परिवारासोबत केलं. आलियाने New Year सेलिब्रेशनचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पण यादरम्यान आलियाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेला ड्रेस चर्चेचा विषय ठरला आहे. पार्टीसाठी आलियाने साधा दिसणारा पण प्रचंड महागडा ड्रेस घातला होता. इतक्या साध्या ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल.

 

 

आलियाच्या ड्रेसबद्दल सांगायचं झालं, तर knowtheirfashion या इंस्टा पेजवरुन आलियाने New Year सेलिब्रेशनसाठी घातलेल्या ड्रेसच्या किंमतीचा खुलासा केला आहे. आलियाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेल्या टॉपची किंमत ३३ हजार ५५१ रुपये आहे, तर ट्राउजरची किंमतव ४१ हजार ९८४ रुपये इतकी आहे.

 

 

आलियाचा ड्रेस पाहिला तर तो अत्यंत साधा दिसत आहे, पण अभिनेत्रीच्या ड्रेसची किंमत 75 हजार 535 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या आलिया नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेल्या महागड्या ड्रेसची किंमत चर्चेचा विषय आहे.

आलियाची New Year पार्टी
नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आलियाने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आलियासोबत रणबीर कपूर, बहिण शाहीन भट्ट आणि अभिनेता आदित्य राय कपूर यांच्यासह अन्य सेलिब्रिटी देखील होते.