Prithvi Ambani Birthday Celebration : गेल्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अंनत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्यानंतर मुंबईत मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. साखपुड्यानंतर मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि सून श्लोका मेहता यांचा मुलगा पृथ्वी अंबानीचा मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. पृथ्वीच्या वाढदिवसाचं आयोजन जियो गार्डममध्ये करण्यात आलं होतं. पृथ्वीच्या दुसऱ्या वाढदिवसासाठी जियो गार्डन लाहन मुलांसाठी सजवण्यात आलं होतं. पृथ्वीचा वाढदिवस १० डिसेंबर रोजी होता. पृथ्वीच्या वाढदिवसासाठी बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध उद्योगपतींनी हजेरी लावली होती.
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता-अंबानी यांच्या मुलाचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात जियो गार्डन याठिकाणी पार पडला. यावेळी आकाश अंबानी यांच्या कडेवर पृथ्वी होता, तर श्वोका यांनी लेकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वनपीस ड्रेस घातला होता.
पृथ्वीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आकाश आणि श्लोका यांनी मुलासोबत पापाराझींना पोज दिल्या. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एवढंच नाही, तर चाहत्यांना देखील आकाश, श्लोका आणि पृथ्वी यांचा फॅमिली फोटो फार आवडला आहे.
पृथ्वीच्या वाढदिवसासाठी वंडरलँड थिम तयार करण्यात आली होती. जियो गार्डनच्या गेटवर वंडरलँड असं लिहिलं होतं. शिवाय सर्वत्र फुगे लावून सजावट करण्यात आली होती. वाढदिवसाच्या दिवशी पृथ्वी प्रचंड क्यूट दिसत होता. वाढदिवसाला आलेल्या प्रत्येक सेलिब्रिटींना पृथ्वीला शुभेच्छा दिल्या.
पृथ्वीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्यांच्या दोन्ही मुलांसोबत आला होता. रूही आणि यश यांनी देखील पृथ्वीच्या वाढदिवसाला हजेरी लावली.
बॉलिवूड कलाकारांसोबत क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींनी देखील पृथ्वीच्या वाढदिवसाला हजेरी लावली. कृणाल पांड्या, पंखुडी पांड्या आणि नताशा त्यांच्या चिमुकल्यांसोबत पृथ्वीच्या वाढदिवसाला पोहोचले होते.