Priyanka Chahar Choudhary On Ankit Gupta : टीव्ही अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) आणि अभिनेता अंकित चौधरी (Ankit Gupta) यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. एवढंच नाही तर, चाहत्यांनी अंकित आणि प्रियंका यांच्या जोडीला डोक्यावर देखील घेतलं. बिग बॉस १६ मध्ये देखील दोघांनी एकत्र एन्ट्री केली. त्यानंतर बिग बॉसच्या घरात देखील अंकित आणि प्रियंका यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. अंकित आणि प्रियंका या जोडीने चाहत्यांच्या मनात घर केलं. दोघे एकमेकांना चांगले मित्र आहोत असं म्हणतात, पण चाहत्यांमध्ये अंकित आणि प्रियंका यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते. बिग बॉसनंतर चाहत्यांना पुन्हा अंकित आणि प्रियंका यांना एकत्र स्क्रिनवर पाहायचं आहे.
अंकित आणि प्रियंका यांनी एकत्र ‘उडारियां’ (Udaariyaan)मध्ये एकत्र काम केलं होतं. ‘बिग बॉस १६’ मध्ये अंकित आणि प्रियंका यांची केमिस्ट्री पाहिल्यानंतर ‘प्रियांकित’ (Priyankit) यांना पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. आता चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खुद्द प्रियंकाने याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अंकित आणि प्रियंका लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहे. नुकताच प्रियंका हिला पापाराझींनी मुंबई याठिकाणी स्पॉट केलं. तेव्हा प्रियंका म्हणाली, ‘मला ‘प्रियांकित’ यांच्या चाहत्यांसाठी बोलायचं आहे. जे माझ्या आणि अंकितच्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच नवीन काही तरी तुमच्या भेटीसाठी येईल…’
पुढे पापाराझींनी प्रियंका हिला अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या ‘डंकी’ सिनेमाबद्दल विचारलं, तेव्हा प्रियंका ‘डंकी’ सिनेमाबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. सध्या सर्वत्र प्रियंका हिच्या वक्तव्याची चर्चा आहे. शिवाय अंकित आणि प्रियंका कोणत्या प्रोजेक्टच्या माध्यमातून भेटीस येणार याबाबतची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहचली आहे.
‘बिग बॉस १६’ मध्ये प्रियंकाचं नशीब
प्रियंका ‘बिग बॉस १६’च्या दमदार स्पर्धकांपैकी एक होती. ‘बिग बॉस १६’ शोचा विजेता घोषित होण्यापूर्वी सर्वत्र प्रियंका हिच्या नावाची चर्चा होती. पण ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी एमसी स्टॅन घरी घेवून गेला. पण सांगायचं झालं तर, बिग बॉसनंतर प्रियंकाच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शिवाय तिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. आता प्रियंका अभिनेता सलमान खान याच्या सिनेमात दिसू शकते असं सांगण्यात येत आहे.