प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी समुद्र किनारी केले लिपलॉक, ‘तो’ फोटो…

| Updated on: Jul 18, 2024 | 2:05 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही लग्नानंतर विदेशात शिफ्ट झालीये. मात्र, असे असतानाही प्रियांका चोप्रा ही कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी समुद्र किनारी केले लिपलॉक, तो फोटो...
Priyanka Chopra
Follow us on

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. प्रियांका चोप्रा हिने निक जोनस याच्यासोबत लग्न केल्यापासून ती विदेशात शिफ्ट झालीये. मात्र, असे असतानाही ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच तिची मुलगी मालती मेरी हिचे काही खास फोटो शेअर केले होते. मालती तिच्या मित्रांसोबत खेळताना या फोटोमध्ये दिसली होती.

आज प्रियांका चोप्रा हिचा 42 वा वाढदिवस आहे. चाहते हे सकाळपासूनच प्रियांका चोप्रा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा हिच्या वाढदिवसाच्या दिवशी पती निक जोनस याने अत्यंत खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबतच निक जोनस याने काही रोमांटिक फोटोही शेअर केले.

निक जोनस याने लिहिले की, जी महिला तू आहेस, मी किती जास्त लकी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव..यासोबतच निक जोनस याने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे समुद्र किनारी लिपलॉक करतानाही दिसत आहेत. निक जोनस याच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी प्रियांका चोप्रा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्यासोबत काही दिवसांपूर्वीच भारतात आली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा ही भारतात दाखल झाली. यावेळी अनंत अंबानीच्या लग्नात चांगलीच धमाल करताना प्रियांका चोप्रा ही दिसली. विशेष म्हणजे प्रियांका आणि निकच्या डान्सचा व्हिडीओही व्हायरल होताना दिसला.

एका व्हिडीओमध्ये अनन्या पांडे ही निक जोनस याला धक्का मारताना दिसली. अनन्या पांडे हिचे हे वागणे निक जोनस याला अजिबातच आवडले नसल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसले. यानंतर रणवीर सिंहने परिस्थिती सांभाळत निक जोनसला पुढे घेतले. या व्हिडीओनंतर अनेकांनी अनन्या पांडे हिच्यावर जोरदार टीका केली.