Priyanka Chopra | ‘भारतीय फिल्म इंडस्ट्री फक्त हिप्स आणि बुब्स…’, प्रियांका चोप्रा हिच्या वक्तव्याने खळबळ

| Updated on: Jul 05, 2023 | 4:49 PM

भारतीय फिल्म इंडस्ट्रीबद्दल अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचं वादग्रस्त वक्तव्य; शरीराच्या प्रायव्हेट पार्ट्सचा उल्लेख करत अभिनेत्री म्हणाली...; सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा..

Priyanka Chopra | भारतीय फिल्म इंडस्ट्री फक्त हिप्स आणि बुब्स..., प्रियांका चोप्रा हिच्या वक्तव्याने खळबळ
Follow us on

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची आज जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हिंदी सिनेविश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्री सिनेमे साकारत गेली, तशीच वेगाने प्रियांकाच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. पण प्रियांकाने स्वतःला फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवलं नाही. अभिनेत्रीने हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ केलं. पण आता अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत आली नसून एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

२०१६ मध्ये जेव्हा एमी पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचली होती, तेव्हा परदेशातील एका पत्रकार महिलेने अभिनेत्रीला भारतीय फिल्म इंडस्ट्रीबद्दल विचारलं होतं. यावर प्रियांकाने दिलेल्या एका उत्तरामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र प्रियांका चोप्रा हिने दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.

भारतीय फिल्म इंडस्ट्रीबद्दल वक्तव्य करताना अभिनेत्रीने प्रायव्हेट पार्ट्सचा उल्लेख केल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं. भारतीय फिल्म इंडस्ट्रीबद्दल प्रियांका म्हणाली, ‘भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त हिप्स आणि बूब्सवर अधिक लक्ष दिलं जातं…’ एवढंच नाही तर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्रीने सर्वांसमोर डान्स देखील करुन दाखवला.

हे सुद्धा वाचा

प्रियांका आता बॉलिवूडपासून दूर हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे.. अशात अभिनेत्री बॉलिवूडला निरोप का दिला.. यामागचं कारण सांगितलं आहे. अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असणाऱ्या राजकारणाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

बॉलिवूडबद्दल काय म्हणाली प्रियांका चोप्रा?

प्रियांका म्हणाली, ‘इंडस्ट्रीने मला एका बाजूला करुन दिलं. लोक मला सिनेमांमध्ये ऑफर करत नव्हते. मला काही खेळ खेळता येत नाहीत. बॉलिवूडमधील राजकारण मला जमलं नाही. म्हणून मी थकली होती. त्यानंतर मला ब्रेक हवा आहे असं मी म्हणाली….’ बॉलिवूडबद्दल प्रियांकाने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.

बॉलिवूडमध्येच नाही तर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून प्रियंका बॉलिवूडपासून दूर आहे. अशात प्रियांका पुन्हा मोठ्या पडद्यावर पुन्हा कधी पदार्पण करणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंलेल्या असतात. पण खुद्द प्रियांकाने बॉलिवूडपासून दूर असल्याचं कारण सांगितलं.. अभिनेत्रीने दिलेल्या उत्तरामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.