मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही फक्त तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत सांगितले होते की, आपल्याला बाॅलिवूडमध्ये सतत एका कोपऱ्यात ढकलले जात होते. बाॅलिवूडमध्ये (Bollywood) खूप जास्त मोठे राजकारण असून या सर्व राजकारणाला कंटाळून मी थांबण्याचा निर्णय घेतल्याचे देखील प्रियांका चोप्रा हिने म्हटले. प्रियांका चोप्रा म्हणाली होती की, तिला बाॅलिवूडमध्ये काम मिळत नव्हते. प्रियांका चोप्रा हिने मुलाखतीमध्ये बाॅलिवूडमधील काही काळे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता.
नुकताच प्रियांका चोप्रा हिने एक मुलाखत दिलीये, या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने मोठा खुलासा केला की, चित्रपटाच्या सेटवर आपल्या रोलसाठी तिला कित्येक तास लाईनमध्ये थांबावे लागत होते. प्रियांका चोप्रा हिला प्रश्न विचारण्यात आला की, तू अशा कोणत्या चित्रपटात कधी काम केले आहे का? ज्याची तुला नफरत होते.
यावर प्रियांका चोप्रा हिने होकार दिला. प्रियांका चोप्रा म्हणाली की, पण मी या चित्रपटाबद्दल तुम्हाला नाही सांगू शकत. परंतू हे खरे आहे की, मला अत्यंत खराब अनुभव आला होता. मला कितीतरी तास लाईनमध्ये उभे राहावे लागले होते आणि खरोखरच माझ्यासाठी ते खूप जास्त कठीण होते. यावेळी प्रियांका चोप्रा हिला तिच्या पर्सनल लाईफबद्दलही प्रश्न विचारण्यात आले.
प्रियांका चोप्रा हिला यावेळी तिच्या आवडत्या खाद्यपदार्थाबद्दल देखील विचारण्यात आले. यावर उत्तर देताना प्रियांका चोप्रा म्हणाली की, मला बर्गरपेक्षाही अधिक पराठा खायला आवडतो. सीरिज सिटाडेलमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा ही चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा ही लवकरच एका मोठ्या हाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झाली होती. प्रियांका चोप्रा ही तिची चुलत बहीण परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठी काही दिवसांपूर्वीच आली होती. प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वी तिच्या पती आणि मुलीसोबतही भारतात आली होती. काही चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रियांका चोप्रा ही भारतात येणार असल्याचे सांगितले जातंय.
प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर आरोप केल्यानंतर लगेचच लोकांनी करण जोहर याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. अनेकांनी सोशल मीडियावर करण जोहर याच्या विरोधात पोस्टही शेअर केल्या होत्या. प्रियांका चोप्रा हिला सपोर्ट करताना कंगना राणावत ही दिसली होती.