मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील स्वतःची खास ओळख तयार केली आहे. एवढंच नाही तर, जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून देखील अभिनेत्रीची ओळख आहे. लग्नानंतर अमेरिकेत राहणारी प्रियांका सध्या भारतात आहे. प्रियांका चोप्रा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल झाली आहे. सध्या अभिनेत्री आगामी सिटाडेल (Citadel) वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. नुकताच सीरिजच्या प्रिमियरचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. दरम्यान प्रियांकाने बॉलिवूडबद्दल केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा रंगली.
प्रियांका हिच्यानंतर अभिनेत्रीची आई मधू चोप्रा यांनी देखील बॉलिवूडबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मधु चोप्रा यांनी बॉलिवूडच्या दुसऱ्या बाजूबद्दल सांगितलं आहे. मधू चोप्रा म्हणाल्या, ‘प्रियांका आणि मी फिल्म आणि ग्लॅमर इंडस्ट्रीसाठी नवे होतो. म्हणून, एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला रस्ता दाखवत आहे.. अशी परिस्थिती होती…’
मधू चोप्रा पुढे म्हणाल्या, ‘बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर प्रियांकाकडून अनेक सिनेमे काढून घेण्यात आले. प्रियांकाने काही सीन करण्यास नकार दिल्यामुळे सिनेमातून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ते सीने करण्यासारखे देखील नव्हते.’ असं देखील मधू चोप्रा म्हणाल्या.
‘जेव्हा प्रियांकाला मिस इंडियासाठी जायचं होतं, तेव्हा कुटुंबाने विरोध केला. प्रियांका अभ्यासात हुशार आहे तर, तिला दुसरा रस्ता दाखवण्याची काय गरज? ही आवड प्रियांकाची नसल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. आम्ही फक्त मनोरंजनासाठी तिला पाठवलं होतं. तेव्हा प्रियांका मला म्हणाली, ‘मला नाही वाटत मी असं काही करू शकेल….’ सध्या अभिनेत्रीच्या आईच्या वक्तव्याची चर्चा तुफान रंगत आहे.
प्रियांका म्हणाली, ‘इंडस्ट्रीने मला एका बाजूला करुन दिलं. लोक मला सिनेमांमध्ये ऑफर करत नव्हते. मला काही खेळ खेळता येत नाहीत. बॉलिवूडमधील राजकारण मला जमलं नाही. म्हणून मी थकली होती. त्यानंतर मला ब्रेक हवा आहे असं मी म्हणाली….’ बॉलिवूडबद्दल प्रियांकाने केलेलं वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे.
प्रियांकाने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही अभिनेत्री तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, जगभरात अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.