मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत आहे. तिथे ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती, परंतु आता युकेमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे ती येथीच अडकली आहे. याच दरम्यान प्रियांकाने लंडनमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. लॉकडाऊन असूनही, प्रियांका तिच्या आईसोबत सलूनमध्ये गेली होते आणि तिथे पोलिसही पोहचले त्यांना लॉकडाऊन नियमांची आठवण करून दिली.आता या सर्व प्रकरणावर प्रियांका चोप्राने स्पष्टीकरण दिले आहे. प्रियांकाचे म्हणणे आहे की, तिने की लॉकडाऊनच्या कुढल्याही नियमाचे उल्लंघन केले नाही. (Priyanka Chopra reveals case of violation of lockdown rules in London)
मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका चोप्राने चित्रपटासाठी तिचे केस कल्लर केले होते आणि याच चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती लंडनमध्ये आहे. ज्यावेळी हे सलून सुरू करण्यात आले होते त्यावेळी तिथे लॉकडाऊनच्या नियमांचे सर्व पालन करण्यात आले होते आणि तिथेल सर्वांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. ज्यावेळी तिथे पोलीस पोहचले तेव्हा त्यांना संपूर्ण कागदपत्र दाखवण्यात आले. प्रियांका चोप्रा बुधवारी संध्याकाळी 5.44 वाजता जोश वुडच्या स्टायलिश सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिची आईसुद्धा प्रियांकाच्यासोबत होती.
मिड डेच्या रिपोर्टनुसार प्रियांका चोप्रा नोव्हेंबरपासून तिच्या आगामी ‘टेक्स्ट फॉर यू ’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. चित्रपटाची टीम सर्वांना अमेरिकेत परत जाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत आहे. चित्रपटाचे शूटिंगही थांबले आहे. यूएसला जाण्यासाठी विशेष परवानगी घेणे आवश्यक आहे. लॉकडाउनचे नियम आणखी कडक करण्यात आल्यामुळे या प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकेल.
देशामध्ये नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरूच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रानेही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. आता यावरूनच सोशल मीडियावर प्रियंकाला जोरदार ट्रोल करण्यात आले होते.
संबंधित बातम्या :
Mission Lion | अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा काम करण्यास दिग्दर्शक जगन शक्ती तयार, घेणार 4 कोटी मानधन!
माझ्यावर अन्याय होतोय म्हणत कंगनाचा ‘नारीचा पाढा’, म्हणते, ‘देशहिताची गोष्ट बोलले की माझ्यावर टीका’
(Priyanka Chopra reveals case of violation of lockdown rules in London)