मुंबई – बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री प्रियंका चोप्राने (actress priyanka chopra) जेव्हा आई होणार असं जाहीर केल्यापासून त्यांच्या चाहत्यावर्गामध्ये एक आनंदाची लाट पसरल्याची पाहायला मिळत होती. चाहत्यांना झालेल्या आनंदात अनेक प्रश्नही पडल्याचे सोशल मीडियावरती (social media) पाहायला मिळाले होते. तसेच प्रियंकाला मुलगा झाला आहे की, मुलगी तसेच प्रियांकाने सरोगसीचा वापर केला होता का ? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर चाहत्यांकडून पाहायला मिळत होते.
प्रियंकाचं मूल प्री मॅच्युअर
आज आम्ही तुम्हाला प्रियांकाच्या मुलाची संपुर्ण माहिती देणार आहोत. मीडीच्या म्हणण्यानुसार प्रियांकाने 15 जानेवारीला मुलाला जन्म दिला आहे. दुस-या रिपोर्टच्या म्हणण्यानुसार प्रियांकाने 12 आठवडे पहिले मुलाला जन्म दिला आहे. याचा अर्थ असा होतो की, प्रियंकाचं मूल प्री मॅच्युअर आहे.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, प्रियंका आणि निकच्या मुलीचा जन्म डिलीव्हरी तारखेच्या आगोदर 12 आठवडे आगोदर दक्षिण कॅलिफोर्निया हॉस्पिटलमध्ये झाला आहे. जोपर्यंत बाळाची तब्येत तंदुरूस्त होत नाही. तोपर्यंत बाळाला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. बाळ पुर्णपणे व्यवस्थित तयार झाल्यानंतर त्याला प्रियांका घरी घेऊन जाईल.
मुलाच्या जन्मा आगोदर संपवली कामं
प्रियंकाच्या मुलाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता, त्यामुळे प्रियांकाने आपली सर्व कामं आटोपून घेतली होती. कारण मुलाचा जन्म झाल्यानंतर तिला बाळाला पुरेसा वेळ देता येईल. प्रियांकाने मुल जन्माला आल्याच्या आठदिवसानंतर ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.
शुक्रवारी, पोस्टमध्ये आनंदाची बातमी देताना प्रियांकाने लिहिले “आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की आम्ही सरोगसीद्वारे मुलाचे स्वागत केले आहे.