अभिनेता सिद्धार्थचं (actor siddharth)वादग्रस्त विधान चर्चेत आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालबाबत (saina nehwal)आक्षेपार्ह विधान केलंय. या प्रकरणी सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी(ptotographer manav mangalani) यांनी सायनाला पाठिंबा दिला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलंय, ‘मी यापुढे सिद्धार्थला कव्हर करणार नाही.’ मानव यांची पोस्ट सायना नेहवालनेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
फोटोग्राफर मानव मंगलानी यांची पोस्ट
मानव मंगलानी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘सिद्धार्थची ही पोस्ट त्याचे संस्कार आणि त्याच्या घाणेरड्या मानसिकतेची साक्ष देते. त्याचं हे विधान मला पटलेलं नाही. त्यामुळे मी इथून पुढे त्याला कव्हर करणार नाही. गेट वेल सून, सिद्धार्थ!’
सायना नेहवालचं विधान काय आहे?
सायनाने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये गेले असता त्यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावर सायना व्यक्त झाली. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहीलंय, ‘देशाचे पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर दुसरं कुणी कसं सुरक्षित राहु शकेल. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जे झालं त्याचा मी निषेध करते.’
No nation can claim itself to be safe if the security of its own PM gets compromised. I condemn, in the strongest words possible, the cowardly attack on PM Modi by anarchists.#BharatStandsWithModi #PMModi
— Saina Nehwal (@NSaina) January 5, 2022
सिद्धार्थच्या आक्षेपार्ह विधानाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
सिद्धार्थच्या विधानाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी महिला आयोगाने मुंबई पोलिस आणि ट्विटरकडून अहवाल मागवला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट केले की, ‘महिला आयोग या प्रकरणाची माहिती घेत आहे.’
सिद्धार्थने ‘रंग दे बसंती’,’चश्मे बद्दूर’या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याआधीही सिद्धार्थने अनेकदा भाजपवर टीका केली आहे.
संबंधित बातम्या-