मुंबई: प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचं काल रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. संगीत विश्वात व सर्वसामन्यांमध्ये ते KK या नावाने लोकप्रिय होते. केके यांना रुग्णालयात आणलं, त्यावेळी त्यांच्या शरीरातील सर्व महत्त्वाचे अवयव निष्क्रिय होते, असं कोलकात्याच्या कॅलकत्ता मेडिकल रिसर्च संस्थेने (Calcutta Medical Research Institute) सांगितलं आहे. कार्यक्रमावरुन परतल्यानंतर कोलकात्याच्या ग्रँड हॉटेलमध्ये त्यांचं निधन झालं. कार्यक्रमा दरम्यानच त्यांना सतत घाम येत होता. त्यांना अस्वस्थ वाटत होते. शेवटच्या क्षणाच्या त्यांच्या व्हिडिओमधून हे स्पष्ट झालय. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. केके यांच्या संगीत कॉन्सर्टसाठी ऑडिटोअरिम प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं होतं. क्षमतेपेक्षा जास्त लोक इथे होते.
केके यांना रुग्णालयात आणलं, त्यावेळी त्यांच्या शरीराचं महत्त्वाचं अंग सुरु असल्याचं कुठलही लक्षण दिसलं नाही, असं रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं. “त्यांची नाडी बंद होती. ECG टेस्टच्यावेळी त्यांच्या ह्दयाचे ठोके बंद होते. त्यामुळे रुग्णालय कुठलीही चाचणी करु शकलं नाही” असं रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं.
केके यांना कोरोनाचीही लागण झाली नव्हती, असं त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितलं. केके पाचव गाणं गाईपर्यंत नझरुल मंच येथील एअर कंडिशनिंग यंत्रणा व्यवस्थित सुरु होती. त्यानंतर ती बंद करण्यात आली” असं चाहत्याने सांगितलं. कॉन्सर्ट दरम्यान केके यांनी यंत्रणांना लाईटही कमी करायला सांगितला. एसी सुद्धा त्यांनी चालू करायला सांगितला