मुंबई | 29 जुलै 2023 : अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सिनेमांमुळे तर कधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे कंगना चर्चेत आली आहे. एका सेलिब्रिटीने लाईव्ह येत कंगना हिला लग्नाची मागणी घातल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. ज्या सेलिब्रिटीने कंगना हिला लग्नाची मागणी घातली आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून पुनीत सुपरस्टार (Puneet Superstar) आहे. लॉर्ड पुनीत (Lord Puneet) या नावाने देखील तो प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
पुनीत शर्मा ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) शोच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस आला होता. पण २४ तासांमध्येच पुनीत याला घराबाहेर काढण्यात आलं. पुनीत याला घराबाहेर काढल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी शोच्या निर्मात्यांवर निशाणा साधला होता. एवढंच नाही तर, नुकताच पुनीत याचं इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आला आहे..
इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यामुळे पुनीतने दुसऱ्या एपवर लाईव्ह येत चाहत्यांसोबत संपर्क साधला आहे. लाईव्ह येत पुनीत याने मोठी घोषणा केली आहे. बिग बॉसनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पुनीत लॉक अप सीझन 2 (Lock Upp 2) झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे.
शोच्या निर्मात्यांनी याबद्दल अधिक काही सांगण्यास नकार दिला. असं पुनीत म्हणाला… लाईव्ह येत चाहत्यांसोबत संपर्क साधत असताना पुनीत याने थेट कंगनाला लग्नाची मागणी घातली आहे. पुनीत स्वतःच्या सिग्नेचर स्टाइल म्हणाला, ‘कंगना रनौत हिला प्रपोज करणार आणि मुलं होणार…’ कंगना हिला लग्नाची मागणी घातल्यामुळे पुनीत चर्चेत आला आहे.
पुनीत याच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉस ओटीटीमध्ये एका दिवसात पुनीत तुफान चर्चेत आला होता. शोमधून काढण्यात आल्यामुळे पुनीत याच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. शिवाय त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या ३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
कंगना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लॉक अप सीझन १ (Lock Upp 1) या वादग्रस्त शोमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती. एवढंच नाही तर, कंगना अनेक मुद्द्यांवद वादग्रस्त पोस्ट करत चर्चेत असते. सोशल मीडियावर कंगनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.