‘शांत, संयमी वागणारेच..’; सूरज जिंकल्यानंतर अभिजीतसाठी पुष्कर जोगची पोस्ट चर्चेत

| Updated on: Oct 08, 2024 | 11:31 AM

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन नुकताच संपुष्टात आला असून सूरज चव्हाणने या शोचं विजेतेपद पटकावलं आहे. तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. यावरून अभिनेता पुष्कर जोगने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

शांत, संयमी वागणारेच..; सूरज जिंकल्यानंतर अभिजीतसाठी पुष्कर जोगची पोस्ट चर्चेत
Suraj Chavan and Pushkar Jog
Image Credit source: Instagram
Follow us on

सत्तर दिवस बिग बॉस मराठीच्या घरात राहिल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने शोची ट्रॉफी आपल्या नावे केली. तर गायक अभिजीत सावंत या शोचा उपविजेता ठरला. सूरज आणि अभिजीत यांच्यात अंतिम चुरस होती. त्यात सूरजने बाजी मारली. एकीकडे बारामतीच्या सूरजचा चाहतावर्ग मोठा होता, तर दुसरीकडे अभिजीतच्या खेळीचेही चाहते अनेक होते. मात्र मतांच्या बाबतीत सूरजने अभिजीतला तगडी मात दिली. सूरज विजेता ठरल्यानंतर सोशल मीडियावर विविध सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. यात बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकांचाही समावेश आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचा उपविजेता ठरलेल्या पुष्कर जोगची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. अभिजीतने शो जिंकावा अशी त्याची इच्छा होती.

पुष्कर जोगची पोस्ट-

‘सूरज चव्हाणसाठी मी खूप खुश आहे. प्रामाणिक, शांत आणि सज्जतनेते वागणारे स्पर्धकच रनर अप्स का ठरतात, असा प्रश्न पडतो. थोडं रिलेटेबल (संबंधित) आहे.. पण विजेत्यांचं मोल कमी होऊ शकत नाही. हार्ड लक अभिजीत सावंत,’ असं पुष्करने या पोस्टमध्ये लिहिलंय. संपूर्ण सिझनमध्ये अभिजीत अत्यंत संयमाने त्याचा खेळ खेळत होता. यामुळे तोच विजेता व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. मात्र सूरजच्या लोकप्रियतेनं अभिजीतला मात दिली. त्यामुळे स्वत:चं उदाहरण देत पुष्करने ही पोस्ट लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

सूरजला 14.60 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्याचसोबत इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाख रुपयांचा ज्वेलरी वाऊचर मिळाला. अभिजीत जरी या सिझनचा विजेता ठरला नसला तरी त्याने सूरजपेक्षा जास्त कमाई केली आहे. सूरज चव्हाणला एकूण 24.6 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. तर बिग बॉसच्या शोसाठी दर आठवड्याला त्याला 25 हजार रुपये फी मिळत होती. याची एकूण रक्कम 2.5 लाख रुपये इतकी होते. या तुलनेत अभिजीतला मिळालेली रक्कम आणि शोचं मानधन मिळून त्याची एकूण कमाई सूरजपेक्षा जास्त आहे.

अभिजीत सावंतला दर आठवड्यासाठी 3.5 लाख रुपये मानधन मिळत होतं. त्यामुळे शोमधून त्याने एकूण 35 लाख रुपयांची कमाई केली होती. अभिजीतची एकूण संपत्ती ही 1.2 ते 8 कोटी रुपये इतकी असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे तो एका परफॉर्मन्ससाठी 6 ते 8 लाख रुपया मानधन घेतो.