मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | ‘पुष्पा : द राईज’ या ब्लॉकबस्टर पॅन इंडिया चित्रपटानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आता ग्लोबल सुपरस्टार झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. इतकंच नव्हे तर यातील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसुद्धा मिळाला होता. आता प्रेक्षकांना ‘पुष्पा : द रुल’ या सीक्वेलची प्रचंड उत्सुकता आहे. ‘पुष्पा 2’विषयी आता महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अल्लू अर्जुनच्या मानधनाविषयीही ही अपडेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी काहीच मानधन घेतलेलं नाही.
मध्यंतरी अशी जोरदार चर्चा होती की ‘पुष्पा’च्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याचं मानधन वाढवलंय. सीक्वेलसाठी तो खूप मोठी रक्कम स्वीकारणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र नव्या अपडेटनुसार, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी काहीच फी घेतली नाही. मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे. यासाठी त्याची स्ट्रॅटेजी समोर आली आहे.
‘पुष्पा 2’मधील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनने सध्या कोणतंच मानधन घेतलं नसलं तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी 33 टक्के भाग त्याला मिळणार आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, जर या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर अल्लू अर्जुनला त्यापैकी 33 टक्के भाग मिळणार आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक कमाई करणार असल्याचा विश्वास अल्लू अर्जुनला आहे. म्हणूनच त्याने निर्मात्यांसोबत ही वेगळी डील केली आहे.
‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता दुसऱ्या भागाचे हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी नेटफ्लिक्सने ॲमेझॉन प्राइम व्हिडीओपेक्षा तिप्पट रक्कम दिली आहे.
अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटासाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ मिळाला. यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. ‘पुष्पा 1’ हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रचंड उत्सुकता आहे.