‘पुष्पा  2 ने खरंच राडा घातलाय; पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतकी’ कोटी कमाई

| Updated on: Dec 05, 2024 | 5:47 PM

5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या "पुष्पा २: द रूल" ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल इतक्या कोटींहून अधिकची कमाई करून या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट हाऊसफुल्ल असून तिकिटांची कमतरता जाणवत आहे.

पुष्पा  2 ने खरंच राडा घातलाय; पहिल्याच दिवशी तब्बल इतकी कोटी कमाई
Follow us on
आज 5 डिसेंबर 2024 रोजी  सर्व प्रेक्षकांना आतुरता होती ती म्हणजेच ‘पुष्पा 2’ची. तसही रिलीजच्या आधीच चित्रपटाने करोडोंमध्ये कमाई केली होती. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची संख्या बघता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार हेदेखील निश्चित होतं. त्यामुळे पहिल्या दिवशी हा चित्रपट काय कमाल करतोय हे पाहणे सर्वांसाठीच औत्सुक्याचं होतं.अर्थातच अपेक्षेपेक्षाही ‘पुष्पा 2’ने धुमाकूळ घातला आहे.
सर्व शहरांतील थिएटर हाऊसफुल्ल
‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सर्वच शहरांतील थिएटर हाऊसफुल्ल असून काहींना तिकीटही मिळत नाहीयेत.  चित्रटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. चित्रपट कमाईच्या बाबतीत तो इतर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचं बोललं जातंय.
 ‘पुष्पा 2’ ची ऍडव्हान्स बुकिंग आधीच काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती.  ऍडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची जवळपास 32 लाख तिकिटं विकली गेली. त्यामुळे रिलीज झा्ल्यानंतर हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमावतोय याकडे सर्वांचे लक्ष होते.
पहिल्याच दिवशी  200 कोटींच्या कमाईचे संकेत
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींच्या वर कमाई करण्याचे संकेत दिले आहेत. सॅकनिक या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार त्यापुढे आज सकाळपासून दुपारी 3 ते 3.30 वाजेपर्यंत या चित्रपटाने तब्बल 58 कोटी 47 लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट संपूर्ण दिवसभरात 100 ते 200 कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज लावला जातोय.
तसेच भारतीय सिनेमाच्या इतिहासातील ‘पुष्पा2’ सर्वात मोठा ओपनर म्हणजे RRR, ज्याने पहिल्या दिवशी 223 कोटी कमावले होते, त्यानंतर बाहुबली ₹217 कोटी आणि कल्की 2898 ADने 175 कोटी कमावले होते. तर ‘पुष्पा 2’  250 कोटींच्या वरचे आकडे गाठत या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणार असं दिसत आहे.
रिपोर्टनुसार हा चित्रपट या वर्षीचा सगळ्यात जास्त ओपनिंग करणारा चित्रपट ठरणार आहे. केवळ यावर्षीचा नाही तर यापूर्वी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सगळ्या चित्रपटांचा ही  पुष्पा2ने  रेकॉर्ड मोडला आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी जगभरात 200 ते 250 कोटींची कमाई करण्याच्या जवळ आहे. त्यामुळे हा चित्रपट या वर्षीचा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो.