Allu Arjun Arrest: जगभरात ‘पुष्पा 2’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करत असताना अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जुन याला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली आहे. सांगायचं झालं तर, सिनेमाच्या कमाईचे रेकॉर्ड तोडले. सिनेमाने आतापर्यंत जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनला अचानक अटक का झाली. असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलीस अभिनेत्याला घेवून जाताना दिसत आहेत.
हैदराबादमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याचप्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणातच पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अल्लू अर्जुन पोलिसांना न कळवता प्रीमियरला गेला होता, असा पोलिसांचा आरोप आहे. ज्यामुळे अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली आणि चेंगराचेरीत महिलेचा मृत्यू झाला. शिवाय महिलेच्या मुलाची प्रकृती देखील चिंताजनक आहे.
महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 5 डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अल्लू अर्जुन पूर्वी थिएटर मालकांपैकी एक, वरिष्ठ मॅनेजर आणि बाल्कनीच्या प्रभारीला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जुनची अटक अशा वेळी झाली आहे जेव्हा अन्य लोकांनी एफआयआर रद्द करण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अभिनेत्याने महिलेच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत करणार असल्याची देखील घोषणा केली. शिवाया महिलाच्या मृत्यूवर दुःख देखील व्यक्त केलं.
अटक टाळण्यासाठी अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अल्लू अर्जुनने बुधवारी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली असून हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणी एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावी… अशी मागणी केली. शिवाय अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली. या प्रकरणी उच्च न्यायालयात अद्याप सुनावणी झालेली नाही.
4 डिसेंबर रोजी हैदराबाद याठिकाणी अभिनेत्याची एक झकल पाहण्यासाठी चाहत्यांची संध्या थिएटर बाहेर एकच गर्दी जमली. याच कारणामुळे थिएटर बाहेर गर्दी जमली होती. अशात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिलाचा मृत्यू झाला तर, महिलेच्या 8 वर्षीय मुलाची प्रकृती देखील चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या सर्वत्र अल्लू अर्जुन याची चर्चा रंगली आहे.