अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ चा टीझर त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमध्ये ‘पुष्पराज’ची झलक पाहायला मिळाली होती. पुष्पा 2 चा या टीझरने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांनी त्याला ब्लॉकबस्टर घोषित करुन टाकले आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये आता त्याची उत्सूकता वाढलेली आहे.
सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ या सिनेमाचा बजेट 500 कोटी रुपये आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच त्याचे हक्क मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. चित्रपटाचे ओटीटी राईट्स घेण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी बोली लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘पुष्पा-2’ चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क प्रदर्शित होण्यापूर्वीच विकले गेले आहेत.
पुष्पा 2: द रुल हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. त्याच्या टीझरवरून असे लक्षात येते की हा सिनेमा मोठी कमाई करु शकतो. हा चित्रपट 2024 मध्ये कमाईच्या बाबतीत इतिहास रचू शकतो. त्यामुळे आतापासूनच OTT प्लॅटफॉर्मशी करार सुरु आहेत. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, संगीत कंपनी आणि चित्रपट निर्मिती टी-सीरीजने या चित्रपटाचे हिंदी सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत.
सिनेमाच्या सॅटेलाइट हक्कांसाठी सुमारे 60 कोटी रुपयांची डील झाली आहे. हिंदी सिनेमाचे सॅटेलाइट हक्क टी-सीरीजकडे असताना, स्टार माने तेलुगूमधील पुष्पा 2 चे सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. तेलुगू चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क कितीला विकले गेले याची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांनी पुष्पा सिनेमात केलेल्या अप्रतिम अभिनयामुळे सिनेमा चांगलाच गाजला होता. आता पुष्पा 2 या वर्षीच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याने त्याची उत्सूकता वाढली आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जुनची दमदार झलक पाहिल्यानंतर आता चाहत्यांची उत्सूकता आणखी शिगेला पोहोचली आहे.
हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण यावेळी त्याचा सामना रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाशी होणार आहे. कारण हा सिनेमा पण च्या दरम्यानच प्रदर्शित होणार आहे. सिंघम अगेन हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये अजय देवगणसोबत रणवीर सिंग-करीना कपूरसारखे अनेक स्टार्स दिसणार आहेत.