R Madhavan Son Won Medals : अभिनेता आर माधवन (R Madhavan) याचा मुलगा फक्त आई – वडिलांचं नाही तर, देशाचं नाव देखील मोठं करत आहे. वेदांत (vedaant madhavan) याने आतापर्यंत अनेक बक्षिस आपल्या नावावर केली आहे. आता वेदांत याने खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये एक दोन नाही तर, चक्क सात मेडल स्वतःच्या नावावर करत नवीन विक्रम रचला आहे. सध्या सर्वत्र आर माधवन याचा मुलगा वेदांत याची तुफान चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर आज प्रत्येक जण वेदांत याचं कौतुक करत त्याला शुभेच्छा देत आहेत. वेदांत याने मध्य प्रदेश याठिकाणी होत असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांवर स्वतःचं नाव नोंदवलं आहे.
मुलाने मिळवलेल्या यशाचा आनंद माधवन याने ट्विटरवर फोटो शेअर करत व्यक्त केला आहे. ट्रॉफी आणि पदकासह मुलगा वेदांत याचा फोटो शेअर करत माधवनने ट्विटमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता म्हणाला, ‘देवाच्या कृपेने १०० मीटरमध्ये सुवर्ण, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये सुवर्ण, ४०० मीटर आणि ८०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले.’ सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
With gods grace -Gold in 100m, 200m and 1500m and silver in 400m and 800m . pic.twitter.com/DRAFqgZo9O
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) February 12, 2023
अभिनेत्याने आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘प्रचंड उत्तर खेळी… अपेक्षा फर्नांडीज (६ सुवर्ण आणि एक रौप्य) , वेतांद माधवन (पाच सुवर्ण आणि २ रौप्य) दोघांचा आभारी आणि विनम्रतेची भावना मनात आहे… ‘ एवढंच नाही तर, खेलो इंडियाचं आयोजन करण्यासाठी आर माधवन याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराय सिंह चौहान आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार देखील मानले आहेत.
CONGRATULATIONS team Maharashtra for the 2 trophy’s ..
1 for boys team Maharashtra in swimming & 2nd THE OVERALL Championship Trophy for Maharashtra in entire khelo games. pic.twitter.com/rn28piOAxY— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) February 12, 2023
आर माधवन याने आणखी एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाचं अभिनंदन केलं आहे. माधवनने लिहिले, “दोन ट्रॉफी जिंकल्याबद्दल टीम महाराष्ट्रचं अभिनंदन.. एक ट्रॉफी स्विमिंगमध्ये तर, दुसरी महाराष्ट्रासाठी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली… म्हणून शुभेच्छा…’ सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.
सांगायचं झालं तर, वेदांत राघवन राष्ट्रीय स्तरावरचा स्विमर आहे. वेदांत याने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत विजय आपल्या नावावर केला आहे. अशात आर माधवन कायम मुलाला सपोर्ट करताना दिसतो. मुलाच्या प्रत्येक यशावर अभिनेता ट्विट करत आनंद व्यक्त करतो. एवढंच नाही तर, अभिनेता 2021 मध्ये मुलाच्या ऑलिम्पिकच्या प्रशिक्षणासाठी पत्नीसह दुबईला शिफ्ट झाला.