Radhika Apte Child: अभिनेत्री राधिका आपटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. राधिका हिने पती बेनेडिक्ट टेलर याच्यासोबत पहिल्या बाळाचं जगात स्वागत केलं. अभिनेत्रीने ऑक्टोबर महिन्यात प्रग्नेंट असल्याचं सांगत चाहत्यांना हैराण केलं. अभिनेत्री लंडन याठिकाणी बेबी बम्प फ्लॉन्ट करतना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात अभिनेत्रीने पहिल्या बाळाला जन्म दिला. लग्नाच्या 14 वर्षांनंतर राधिका हिने आई होण्याचा निर्णय घेतला.
आई झाल्यानंतर राधिकाने पहिल्यांदा बाळासाबोत फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री बाळाला स्तनपान करताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीचे चाहत्यांना सांगितलं, एका आठवड्यात बाळाच्या जन्मानंतर पहिली कामासंबंधी मिटिंग… राधिका आणि तिच्या बाळाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि केमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
राधिकाने बाळासोबत पहिला फोटो पोस्ट करताच फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला. गुलशन देवैया, झोया अख्तर, सत्यदीप मिश्रा, ईशा तलवार, दिव्येंदु, इरा दुबे, श्वेता त्रिपाठी, होमी अदजानिया यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी राधिकाला शुभेच्छा दिल्या.
राधिका आपटे हिला तिचं खासगी आयुष्य गुप्त ठेवायला आवडतं. अभिनेत्री कधीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत नाही. एका मुलाखतीत राधिका म्हणाली होती, ‘मला असं वाटलं बेबी बम्प दिसणार नाही. जर प्रिमियर नसता तर, कधीच माझ्या प्रेग्नेंसीबद्दल कोणाला कळलं नसतं. ‘ओह… मी प्रेग्नेंट आहे…’ अशी पोस्ट देखील मी कधीच केली नसती… कारण हे माझं खासगी आयुष्य आहे…’
राधिका आपटेने सांगितले की, तिच्यासाठी प्रेग्नेंसी सोपी नव्हती. ‘प्रेग्नेंसी सोपी नाही. काही महिलांसाठी प्रेग्नेंसी फार कठीण नसते. प्रेग्नेंसी खूप कठीण असते आणि शरीरात सतत मोठे बदल होत असतात. माझ्यासाठी तो एक खडतर प्रवास झाला आहे. मला याबद्दल खोटं बोलायचं नाही. स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार करणे खूप महत्वाचं आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.