मुंबई : राधिका आपटे ही कायमच चर्चेत असते. राधिका आपटे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच राधिका आपटे हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमुळे राधिका आपटे तूफान चर्चेत आलीये. या पोस्टमध्ये राधिका आपटे हिने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राधिका आपटे हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. हेच नाही तर लोक या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये राधिका आपटे ही संताप व्यक्त करताना दिसतंय.
राधिका आपटे हिच्यासोबत विमानतळावर एक हैराण करणारी घटना घडलीये. याबद्दलच लिहिताना राधिका आपटे ही दिसलीये. राधिका आपटे हिने थेट गंभीर आरोप करत काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. राधिका आपटे आणि काही प्रवासी हे विमानतळावर ताटकळत बसले आहेत. हेच नाही तर साधे पाणी देखील त्यांना प्यायला मिळत नाहीये.
राधिका आपटे हिने ही पोस्ट थेट इन्स्टाग्रामवर शेअर केलीये. राधिका आपटे हिने लिहिले की, आज सकाळी 8:30 वाजता माझी फ्लाइट होती. मात्र, आता 10:50 वाजले आहेत आणि फ्लाइटमध्ये चढले नाहीये. विशेष म्हणजे हे सांगितले की आम्ही बोर्डिंग करत आहोत आणि सर्व प्रवाशांना एरोब्रिजवर ठेवले आणि लॉक केले. या दरम्यान लहान मुले, वयस्कर प्रवासी देखील ताटकळत बसले आहेत.
तासभराहून अधिक काळापासून आतून बंद केले आहे. सुरक्षेमुळे दरवाजे उघडणार नाहीत, कर्मचार्यांना याची अजिबात कल्पना नाहीये…राधिका आपटे हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती जमिनीवर बसलेली दिसत आहे. यासोबतच तिने काही इतर प्रवासांचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. यामध्ये सर्वजण ताटकळत उभे राहिल्याचे दिसतंय.
लहान मुले आणि वयस्कर लोक देखील दिसत आहेत. आता राधिका आपटे हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. राधिका आपटे हिच्या या पोस्टवर अनेकजण हे कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, मॅडम हे विमान मालदीवला जात आहे का? अनेकांचे म्हणणे आहे की, हे फ्लाइट मालदीवलाच जात आहे.