‘मी लग्नासाठी…’, Parineeti Chopra सोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना राघव चड्ढा यांचं लक्षवेधी वक्तव्य

| Updated on: Apr 05, 2023 | 3:59 PM

Parineeti Chopra सोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना राघव चड्ढा यांनी लग्नाबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, 'मी लग्नासाठी तयार आहे, पण.... '

मी लग्नासाठी..., Parineeti Chopra सोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना राघव चड्ढा यांचं लक्षवेधी वक्तव्य
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकल्यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिणीतीला हॉटेलबाहेर खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट केल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे. एवढंच नाही तर, परिणीती आणि राघव चड्ढा यांची लग्नाची तयारी देखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव आरोरा यांनी ट्विट करत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

एवढंच नाही तर, एप्रिल महिन्यात दोघे साखरपुडा करणार असल्याच्या चर्चां रंगत असताना राघव चड्ढा यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीत राघव चड्ढा यांना विचारण्याच आलं होतं की, ‘प्रेम विवाह करणार की, कुटुंबाच्या इच्छेनुसार लग्न करणार?’ यावर राघव चड्ढा म्हणाले, ‘लग्न करण्यासाठी तयार आहे..’

पुढे होस्टने राघव यांना विचारलं, ‘तुमच्या घरी बरीच स्थळं येत असतील?’ यावर प्रश्नाचं उत्तर देताना राघव चड्ढा म्हणाले, ‘तुमच्या नजरेत कोणी चांगली मुलगी असेल तर मला नक्की सांगा…?’ सध्या सर्वत्र राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. पण दोघांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती – राघव यांचं एकाच कॉलेजमध्ये शिक्षण झालं असलं तरी, दोघांच्या प्रेमाची सुरुवात मात्र नुकताच झाली आहे. दोघे पंजाब येथे भेटले आणि दोघांमधील प्रेम बहरलं. परिणीती तेव्हा पंजाब येथे सिनेमाचं शुटिंग करत होती. तेव्हाच दोघांची भेट झाली आणि भेटीचं रुपांतर प्रेमात झालं असं सांगण्यात येत आहे.

पण दोघांच्या नात्याला किती वर्ष पूर्ण झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण रिपोर्टनुसार त्यांच्या नात्याला ६ महिने झाले असून दोघांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली आहे. तर यावर परिणीती – राघव कधी स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (Parineeti Chopra – Raghav Chadha)

परिणीती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. शिवाय सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे परिणीती खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.