मुंबई : शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा याच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले. यावेळी शिल्पा शेट्टी आणि संपूर्ण कुटुंब एक वेगळ्या परिस्थितीमधून जाताना दिसले. इतकेच नाही तर राज कुंद्रा याच्यावर झालेल्या आरोपांनंतर अनेकांनी थेट शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिला देखील टार्गेट करण्यास सुरूवात केली. राज कुंद्रा हा बिग बाॅसच्या घरात सहभागी होऊन काही मोठे खुलासे करणार असल्याची चर्चा जोरदार रंगताना दिसली.
राज कुंद्रा याने बिग बाॅसच्या घरात सहभागी न होता. आपल्या चित्रपटातून सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. राज कुंद्रा याचा यूटी 69 चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाचा ट्रेलर लाॅन्च कार्यक्रम नुकताच पार पडलाय. यावेळी मिडियासोबत बोलताना राज कुंद्रा हा खूप जास्त भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले.
राज कुंद्रा थेट म्हणाला की, मला काय बोलायचे ते बोला…मात्र, माझ्या मुलांना आणि पत्नीला काही बोलू नका. हे म्हणताना ढसाढसा रडताना राज कुंद्रा हा दिसला. यावेळी राज कुंद्रा याने अत्यंत मोठा खुलासा केला. इतकेच नाही तर राज कुंद्रा थेट म्हणाला की, या पृथ्वीवरील सर्वात वाईट जागा ही जेल आहे.
राज कुंद्रा म्हणाला, एका ब्रिटीश नागरिकाला तुम्ही ज्याप्रकारे जेलमध्ये आणता ते एक खूप वेगळे असते. तुम्हाला ज्याप्रकारचे तिथे जेवणे दिले जाते, पाण्याचे वरण, राहण्याची जागा हे खूप वेगळे आहे. माझ्या गुडघ्याला त्रास असल्याने मी भारतीय शौचालयात जाऊ शकत नव्हतो. त्यानंतर त्यांनी मला इंग्लिश टॉयलेट दिले आणि तेही खूप भयानक होते.
माझ्यासोबत 69 दिवसांमध्ये काय काय झाले हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. जसे अमेरिकन चित्रपटात दाखवले जाते तसे जेल अजिबातच नाही. जेलचे एक काळे सत्य मी तुम्हाला चित्रपटातून दाखवणार आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर जेल हे पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण असल्याचे देखील राज कुंद्रा याने म्हटले आहे.