झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना अभिनेत्रींनी केला आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याची पूर्वी पत्नी चारू असोपा. चारू आणि राजीव आता एकत्र राहात नाहीत. दोघांना एक मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर राजीव याने चारुची साथ सोडली. दोघांमधील वाद इतके टोकाला गेले की, चारू आणि राजीव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्यानंतर चारूने मुलीची जबाबदारी स्वीकारली.
दोघांचे वाद चव्हाट्यावर आल्यानंतर चारू आणि राजीव यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. राजीव सतत चारू हिच्यावर संशय घेत होता. राजीव माझी फसवणूक करत आहे… असं सुरुवातीला चारू म्हणाली. एवढचं नाही तर, राजीव याने देखील पत्नीवर गंभीर आरोप केले.
चारुचं ड्रायव्हरसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप… राजीव याने केला. यावर एका मुलाखतीत चारू म्हणाली, ‘राजीव काही कारण नसताना माझ्यावर सतत घ्यायचा. घरी कोणी आलं आणि मी त्यांची विचारपूस केली तरी राजीव माझ्यावर संशय घ्यायचा… उत्तर दिलं तरी राजीव संशय घ्यायचा…’
पुढे चारु म्हणाली, ‘नवरा मला म्हणाला, तुझं ड्रायव्हरसोबत प्रेमसंबंध आहेत. तो जे काही बोलत होतां, त्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं. मी मॅरिज काउंसलरकडे जाण्यासाठी देखील तयार होती. पण राजीम माझ्यासोबत यायला तयार नव्हता…’ असं देखील चारू म्हणाली.
चारूने राजीववर अनेक गंभीर आरोप केले होते, ‘मला कायम वाटायचं राजीव माझी फसवणूक करत आहे. त्याच्या आयुष्यात कोणती दुसरी मुलगी आली आहे. तो कायम दिल्लीत जायचा… मी सेटवर असताना देखील तो सतत मेसेज आणि कॉल करत राहायचा… अन्य लोकांना फोन करायचा आणि ‘चारूपासून सावध राहा…’ असं सांगायचा.’
रिपोर्टनुसार, दोघांमधील वाद आता मिटले आहेत. पण अद्यापही दोघे एकत्र राहात नाही. चारु तिच्या मुलीसोबत राहाते आणि राजीव कायम दोघींना भेटण्यासाठी येत असतो… त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.